Jee Le Zara Postponed: ‘जी ले ज़रा’ चे शूटिंग ढकलले पुढे; आलिया, कतरिना अन् देसी गर्ल दिसणार एकत्र

Jee Le Zara Shooting Postponed: ‘ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा’ (Zindagi Milegi Na Dobara) चा फीमेल वर्जन पाहायला मिळणार आहे.
Jee Le Zara Postponed: ‘जी ले ज़रा’ चे शूटिंग ढकलले पुढे; आलिया, कतरिना अन् देसी गर्ल दिसणार एकत्र
Jee Le Zara PostponedDainik Gomantak

फरहान अख्तरचा आगामी 'जी ले जरा' या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. याआधी 2022 च्या तिसर्‍या क्वार्टरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. पण आता 'जी ले जरा' चित्रपटाचे शूटिंग 2023 पूर्वी सुरू होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 'जी ले जरा' हा चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जात आहे. त्याचबरोबर चित्रपटाची कथा झोया अख्तर आणि रीमा कागतीने लिहिली आहे. या चित्रपटात इंडस्ट्रीतील तीन दिग्गज अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (alia bhatt priyanka chopra katrina kaif Movie Jee Le Zara Postponed news)

यावर विश्वास ठेवला तर हा चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चे फिमेल व्हर्जन असणार आहे. आता जाणून घेऊया काय कारण आहे, ज्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग 2022 वरून 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. वास्तविक, तिन्ही अभिनेत्रींना एकत्र तारिख न मिळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jee Le Zara Postponed
टॉलिवूडची टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या (Movie) प्री-प्रॉडक्शन आणि कॉस्टारची निवड करण्याचे काम सुरू केले गेले आहे. जेणेकरून 2023 मध्ये जेव्हा चित्रपट फ्लोरवर येईल, तेव्हा सर्वकाही योजनेनुसार होईल.

alia bhatt priyanka chopra katrina kaif
alia bhatt priyanka chopra katrina kaifDainik Gomantak

आलिया (Alia Bhatt), प्रियांका आणि कतरिनाच्या (katrina kaif) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्टार प्रियांका 'स्पाय थ्रिलर' वेबसीरिज 'सिटाडेल'मध्ये आणि कतरिना कैफ 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com