टॉलिवूड अभिनेत्रींचा आलियाने मोडला रेकॉर्ड? 'RRR’ साठी घेतले 'एवढे' मानधन

टॉलिवूड अभिनेत्रींचा आलियाने मोडला रेकॉर्ड? 'RRR’ साठी घेतले 'एवढे' मानधन
aaliya.jpg

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच एस. एस. राजमौली (S. S. Rajmouli) यांच्या ‘RRR’ या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. परंतु या चित्रपटासाठी आलियाने घेतलेले मानधन हे दक्षिणात्य अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जाते.

आलिया ‘RRR’ या चित्रपटात 'सीता' (Sita)  ही भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील तिचा लूक सोशल मिडियावर (social media) चांगलाच चर्चेला जात आहे. आलियाने या सिनेमासाठी 6 कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते. हे मानधन दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जात आहे. पंरतु आलियाने बॉलिवूडमधील चित्रपट पाहता निर्मात्यांनी तिला तगडे मानधन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.  (Alia breaks Tollywood actress record So much honorarium taken for RRR)

मागील काही दिवसांपूर्वी, ‘RRR’सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर पाहता या सिनेमाची कथा स्वातंत्रपूर्व काळातील दाखवण्यात  येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच या सिनेमाची कथा तेलंगणा (Telangana) आणि आंधप्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील अलुरी सिथारामराजु (Aluri Sitharamaraju) आणि कोमरा भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. कोमराम भीम ही भूमिका ज्युनिअर एनटीआर साकारणार आहेत. 'आरआरआर' सिनेमात आलियासोबतच अजय देवगण (Ajay Devgan), राम चरण, ओलिविया मॉरिस, ज्युनिअर एनटीआर (Junior NTR)  हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा 8 जानेवारी 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे हा सिनेमा हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्न्ड भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com