Pooja Bhatt: आलिया ही महेश भट्ट अन् पूजा यांची मुलगी? अभिनेत्री म्हणते...

Pooja Bhatt: आता आपल्या देशात ही फॅशन झाली आहे. नात्यातीलच माणसांसोबत काहीतरी वेगळी नाती जोडली जातात आणि लोक त्यावर चर्चा करताना दिसतात.
Pooja Bhatt
Pooja BhattDainik Gomantak

Puja Bhatt: बॉलीवूडचे कलाकारांविषयी सामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे हे कलाकार कधी त्यांच्या पर्सनल तर कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असतात. बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये झळकलेली पूजा भट्ट देखील आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते.

महेश भट्ट यांची मोठी लेक पूजा भट्टने एका मुलाखतीत तिच्याविषयी पसरलेल्या अफवांविषयी वक्तव्य केले आहे. ती म्हणते, आता आपल्या देशात ही फॅशन झाली आहे. नात्यातीलच माणसांसोबत काहीतरी वेगळी नाती जोडली जातात आणि लोक त्यावर चर्चा करताना दिसतात.

आलिया भट्ट ही महेश भट्ट आणि पूजा यांची मुलगी असल्याच्या अफवेवर बोलताना पूजा भट्टने आपले मत व्यक्त केले आहे. पुढे ती म्हणते, जे लोक अशा प्रकारची वक्तव्ये करतात ते कोणत्या पातळीवर आहेत हे समजते. आपण त्यावर बोलून, रिअॅक्ट होऊन आपली पातळी खाली का आणायची असे पूजा भट्ट यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या नात्याविषयी अनेक अफवा आहेत. त्यांच्या लिपकिसवर देखील अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर आलिया महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी असल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या.

Pooja Bhatt
Nana Patekar: 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात नसल्याबद्दल अखेर नाना बोलले! 'त्यांना वाटतं आम्ही जूने...'

२०१२ मध्ये जेव्हा आलिया कॉफी विथ करण या शोमध्ये आली होती. तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला होता. ती स्वत:बद्दल जेव्हा अफवा ऐकते तेव्हा सगळ्यात वाईट अफवा कोणती वाटते? तेव्हा तिने उत्तर दिले होते, ती जेव्हा ऐकते की मी पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे. ही अफवा मला सगळ्यात वाईट अफवा वाटत असल्याचे आलियाने म्हटले होते.

पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि पहिली पत्नी किरण भट्ट यांची मुलगी असून आलिया महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे. पूजा आणि आलिया सावत्र बहिणी आहेत. पूजा नुकतीच बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसून आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com