Allu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मागील महिन्यात 28 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते; परंतु आता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

चेन्नई: कोरोना व्हायरसमुळे(Covid-19) देशभरात भितीदायक वातावरण पसरले आहे. कोरनाच्या दुसर्‍या लाटेत फक्त सामान्य व्यक्तीच नाही तर चित्रपट(Film) सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना विषाणूने बॉलीवूड(Bollywood) आणि टॉलिवूड(Tollywood) सिनेसृष्टीतील अभिनेते आणि प्रादेशिक कालाकारांना घेरले आहेत. आता असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे. आणि घरी परतले आहे. अशातच दाक्षिणात्य तेलगू सुपरस्टार(Telugu superstar) अल्लू अर्जुन(Allu Arjun) कोरोनाला पराभूत करून घरी परतला आहे. अर्जुनला घरातील क्वॉरंटाइन करण्यात आले होते. आणि आता त्याच्या कमबॅकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलांना भेटताना दिसत आहे. (Allu Arjun became emotional when he meet children After 15 days)

रजनीकांतने लस घेतल्याचा चाहत्यांना होतोय फायदा

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला मागील महिन्यात 28 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते; परंतु आता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. लवकरच तो आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. त्याने ही बातमी सोशल मीडियावर दिली आहे. तो म्हणतो, ‘‘मी पंधरा दिवस होम क्वारंटाईन होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली. आता मी ठिकठाक झालो आहे. माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना केली... त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आता लॉकडाऊन आहे. तुम्ही सगळ्यांनी घरीच राहा आणि आपली काळजी घ्या.’’ 

 

Radhe Movie: राधे इफ्केट, झी 5 चा सर्व्हर क्रॅश, प्रेक्षकांनी भाईजानला मारली हाक

दरम्यान दिग्दर्शक विकास बहलच्या ‘गणपत’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, यात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले असले, तरी पुढील तीन महिन्यांत चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशातच आणखी एक बातमी या चित्रपटाशी संबंधित आली आहे. टायगर आणि क्रितीबरोबरच या चित्रपटात आता नोरा फतेहीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नोरा फतेहीने आपल्या दिलखेचक नृत्याने कित्येकांची मने जिंकलेली आहेत. 

संबंधित बातम्या