Birthday Special: 'पुष्पा’च नाही तर ‘या’ चित्रपटांमध्येही दिसला Allu Arjun चा रावडी अंदाज

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या प्रसिद्ध चित्रपटांबद्दल अधिक माहिती.
Allu Arjun Famous Movies List
Allu Arjun Famous Movies ListDainik Gomantak

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आज आपला 40 व वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्टाईलचे अनेक चाहत्यांना (Fan) वेड लावले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या प्रसिद्ध चित्रपटांबद्दल (Movie) जाणून घेऊया. (Allu Arjun Famous Movies List)

* रेस गुर्रम

हा चित्रपट एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका सामान्य मुलाची कथा असून त्याचे आयुष्य अचानक बदलून जाते, जेव्हा एक धोकादायक गुन्हेगार शिव रेड्डी त्याच्या आयुष्यात येतो. चाहते हा चित्रपट यूट्यूबवर देखील पाहू शकतात.

* सराईनोडू

हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटात अल्लू अर्जुनने एका माजी सैनिकाची भूमिका केली होती. चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या दमदार अ‍ॅक्शनसोबतच, त्याच्या रोमँटिक स्टाइल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हा चित्रपट (Movie) तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकतात.

Allu Arjun Famous Movies List
जम्मू-काश्मीर पोलिसांनी रिलीज केली 'द अनटोल्ड काश्मीर

* वैकुंठपुरमलो

हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झालेला असून हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेही झळकली होती. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

* पुष्पा : द राईज

या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका त्याने आजपर्यंत साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा पेक्षा अधिक वेगळी होती. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनचा एका मजुरापासून ते चंदन तस्करी किंग बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com