Pushpa 2 च्या बजेटपासून ते रिलीज डेटपर्यंत जाणुन घ्या एका क्लिकवर

Pushpa 2 Latest Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटानंतर आता प्रेक्षकांचे त्याच्या सीक्वलकडे लक्ष लागले आहे.
Pushpa 2
Pushpa 2Dainik Gomantak

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' (Pushpa) चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच पुष्पा या चित्रपटाच्या सीक्वल अर्थात 'पुष्पा द रुल'शी संबंधित अनेक अपडेट्स समोर येत आहेत, जे जाणून चाहत्यांना आनंद होईल.

पुष्पा या चित्रपटाची क्रेझ भारतातच (India) नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने (Movie) जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या क्रेझमुळे आता निर्माते 'पुष्पा 2' मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्याची तयारी करत आहेत.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, यावेळी हा चित्रपट केवळ 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा देखील समाविष्ट असेल. याशिवाय, निर्माते प्रमोशन बजेट देखील पाच पट वाढवू शकतात. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी रविशंकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीसाठी 500 कोटी रुपये लागतील.

Pushpa 2
2 Years Of Dil Bechara: संजना सांघीने शेअर केल्या सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाच्या आठवणी!

कधी होणार प्रदर्शित

हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होउ शकतो. अल्लू अर्जुनसोबत फहद फाजील आणि रश्मिका मंदान्ना मुख्य बुमिकेत दिसणार आहे. तर दुसरा खलनायक म्हणून विजय सेतुपतीची एंट्री अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com