Viral Video: सातासमुद्रापारही ‘नाटू नाटू’ गाण्याची क्रेज! अमेरिकन पोलीसही थिरकले, पाहा व्हिडिओ

‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याने यंदाचा ऑस्कर जिंकत इतिहास रचला आहे.
Viral Video:
Viral Video:Dainik Gomantak

Oscar winner Naatu Naatu Song: ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याने यंदाचा ऑस्कर जिंकत इतिहास रचला आहे. या चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापलिकडे गेली आहे.

या गाण्यावर आता अनेक लोक रील्स आणि व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये चक्क अमेरिकन पोलीस ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.

सोशल मिडियावर ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर लोक डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता अमेरिकन पोलीसही या गाण्याची सिंगनेच स्टेप करतांना दिसत आहे.

ऑस्कर सोहळ्यापूर्वी नेनावत जगन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. मात्र, चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. होळीच्या दिवशी हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये होळी खेळतांना लोक दिसत आहे.

Viral Video:
Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या, इस्लामाबाद पोलिस करणार अटक

यावेळी सगळे लोक रंग आणि गुलालात रंगलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक माणूस पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवून हुक स्टेप करत असल्याचे दिसत आहेत. तर, पोलीस देखील या गाण्याच्या आकर्षक बीट्सवर नाचताना दिसत आहेत.

जगन यांनी या व्हिडीओमध्ये माहिती देताना सांगितले की, हा व्हिडीओ टेक्सासमध्ये बनवला गेला आहे. या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला 5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com