रणवीर नंतर अमेरिकन गायिकेने शेअर केले हॉट पोझमध्ये न्यूड फोटो

अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्सने तिचा प्रियकर सॅम असगरी याच्याशी लग्न केले आहे.
Britney Spears
Britney SpearsInsta

वॉशिंग्टन: बॉलिवूड स्टार रणवीर सिंगने केलेल्या फोटोशूटची जगभर चर्चा आहे. रणवीरच्या या फोटोशुटमुळे त्याच्यावर FIRही दाखल करण्यात आली आहे. असे असताना अमेरिकेत असाच एक फोटोशूट एका गायिकेने केला आहे. अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्सने (Britney Spears) आज एक अनोखी पोस्ट शेअर कली आहे. त्यामुळे रणविर सिंग नंतर गायिका ब्रिटनी स्पीयर्स अलीकडच्या काळात चर्चेत आहे. ब्रिटनीने आपले अर्धनग्न फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. "कीप इट क्लासी" असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. यामध्ये तिची कामूक अदा दिसून येत आहे. (Britney Spears Photo)

सिंगरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना तिने आश्चर्यचकित केले. असे फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पॉप म्युझिक आयकॉन ब्रिटनी स्पीयर्सने इंस्टाग्रामवर याआधी 10 हून अधिक नग्न फोटो शेअर करून पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. 40 वर्षीय गायिका ब्रिटनीने लंडनला हनिमूनला आली असताना आपल्या इंन्स्टाग्रामवर हॉटेलच्या खोलीतून काही फोटो शेअर केले होते. 'बेबी वन मोअर टाईम' च्या या गायिकेने अलीकडेच तिचा दीर्घकाळचा प्रियकर सॅम असगरी याच्याशी लग्न केले आहे.

तिने तिचे बोल्ड फोटो किंवा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. गायिकेने अलीकडेच तिच्या हनीमूनचे प्रायव्हेट टाइमचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. ज्यामध्ये ती तिच्या हातांनी तिच्या शरीराचे खाजगी भाग झाकताना दिसत आहे. दरम्यान, 2016 मध्ये स्पीयर्सने तिचा शेवटचा अल्बम 'ग्लोरी बॅक' रिलीज केला, रिपोर्ट्सनुसार ग्रॅमी विजेती सध्या सहा वर्षांनी तिच्या नवीन गाण्यावर काम करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com