...म्हणून शुटिंग सोडून निघून गेला आमिर खान

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता आमिर खान आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो वास्तविक जीवनात एक चांगला माणूस देखील आहे.

मुंबई: बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता आमिर खान आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो वास्तविक जीवनात एक चांगला माणूस देखील आहे. म्हणूनच त्याने एका चांगल्या मैत्रीचे उदाहरण आपल्या चाहत्यांपुढे ठेवले आहे.  आपला मित्र अमीन हाजी याच्या मदतीसाठी आमिरने आपल्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाचे काम करणे थांबवले आहे आणि आपल्या मित्रासाठी त्याने एका खास गाण्यावर काम केले आहे.

आमिन खानने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्यानंतर आपल्या चित्रपटातील एका गाण्यात खास कामगिरी करताना दिसणार आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या गाण्यात आमिर अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. त्याचा लूक एकदम हिपस्टर स्टाईलचा असणार आहे. जयपूरमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आमिरने आपल्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाचे शूटिंग थांबवून यासाठी विषेश वेळ काढला आहे.

आमिरवर आमिनचा पूर्ण विश्वास आहे

मिळालेल्या माहितीनुसार अमीनला आमिर खानवर पूर्ण विश्वास आहे. मग त्यांनी गाण्याच्या तयारीवरुन त्यांच्याशी चर्चा केली आणि उर्वरित गाण्याच्या निर्मिती बाबत त्यांचे मत घेतले. "अमीनचा आमिरवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या परिपूर्णतेची आणि अनुभवाची त्याला कदर आहे. मग परस्परांशी चर्चा केल्यानंतर अमीनने तातडीने काही विचार न करता आमिरला या गाण्यासाठी होकार दिला." अशी माहिती सुत्रांनी सांगितली आहे.

ऐली अवराम सोबत झळकणार

गाण्यात आमिरसोबत अभिनेत्री ऐली अवराम दिसणार आहे. यात आमीर सुपर चिलिड आउट लूकमध्ये दिसणार आहे. गाण्याच्या शूटिंग दरम्यान क्रू ने बरीच मजामस्ती केली. या नवीन गाण्याबद्दल टीम खूप उत्साही आहे. आणि लवकरच हे गाणे रिलीज होणार आहे.

करचुकवेगिरीप्रकरणी तापसी पन्‍नू व अनुराग कश्‍यपची आयकर विभागाकडून रात्री उशीरापर्यंत चौकशी 

 

संबंधित बातम्या