अमिषा पटेलचा 'ग्लॅमरस लूक'; पाहा गोवा बीचवरचे फोटो

अमिषा पटेलचा 'ग्लॅमरस लूक'; पाहा गोवा बीचवरचे फोटो
Amisha Patel is seen chilling in Goa

पणजी: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच एका कार्यक्रमासाठी गोव्याला गेली आहे. देशभरातील कोविड -19च्या रूग्णसंख्येमध्ये चिंताजनक वाढ होत असताना अमिषा पटेल गोव्यात चिल करातांना दिसत आहे. कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाच्या पूर्ण नियमांचे पालन कराताना ती दिसत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे. 

हा कार्यक्रम पार पडल्यानंतर बीचवर अमिषाने थोडा वेळ घालवला. कार्यक्रम पूर्ण झाल्याने अभिनेत्री आता गोवा पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे.  मात्र गोवा  बीच वर फोटोसेशन करताना अभिनेत्रीला मास्कचा विसर पडला आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर अमिषा एंजॉ़य करत आहे. गेल्या वर्षी पासून देशात कोरोनाचा हाहाकार असतांना सगळीकडे लॉकडाउन होते. मुंबईत देखील कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने संपूर्ण लॉकडाउन होते.

त्यामुळे अमिषा गोव्यात relax mood मध्ये दिसली आहे. अमिषाने पोस्ट केलेल्या व्डिडिओमध्ये तीने स्काय ब्लू कलरचा स्कर्ट घातला आहे आणि त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तीचा हा ग्लॅमरस लूक बघून फॅन्स फिदा झाले आहे.  गोवा बीचवर एकदम कुल अंदाजात अमिषा दिसत आहे. फिटनेस व्हिडिओंपासून ते हटके फोटोशूट्सपर्यंत चे व्हिडिओ अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नेहमीच शेअर करत असते. 

कधीकधी तीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो पण बिनधास्त लूकसाठी अमिषाला ओळखलं जाते.  अमिषाने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा "कहो ना… प्यार है’ या चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. ब्लॉकबस्टर अभिनेता हृतिक रोशन सोबत तीने सिनेसृष्टीत पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. त्यानंतर 'गदर: एक प्रेम कथा', 'हमराझ' आणि इतर बर्‍याच हिट चित्रपटात अमिषाने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com