अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करण्यास दिला होता नकार; कारण आले समोर

Amitabh Bachchan and Rekha Breakup : 'सिलसिला' हा अमिताभ आणि रेखाचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ही जोडी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही.
अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करण्यास दिला होता नकार; कारण आले समोर
Amitabh Bachchan and Rekha BreakupDainik Gomantak

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. मोठ्या पडद्यावर रेखा आणि अमिताभ यांच्या जोडीची चर्चा तर होतीच, पण खऱ्या आयुष्यातही त्यांच्या वाढत्या जवळीकांमुळे ही जोडी चर्चेतही होती. माहितीनुसार, 'दो अंजाने' हा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ आणि रेखाची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि त्यानंतर त्यांनी जवळपास 10 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Amitabh Bachchan and Rekha Breakup
मलायका - अर्जुन वेगळे होणार? सर्वत्र 'Breakup' ची चर्चा

'सिलसिला' हा अमिताभ आणि रेखाचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ही जोडी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही. वास्तविक रेखासोबतच्या जवळीकीची ज्योत अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत पोहोचली होती. यानंतर बिग बींनी रेखासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

असे म्हटले जाते की अमिताभ यांनी जवळजवळ प्रत्येक निर्माता/दिग्दर्शकाला सांगितले होते की ते यापुढे रेखासोबत काम करणार नाहीत. मात्र, अमिताभ यांनी रेखा यांना हे सांगितले नाही आणि त्यांना दुसऱ्याच व्यक्तीकडून हे कळले. जेव्हा या निर्णयाची माहिती मिळाली तेव्हा रेखा यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.

रेखाला अमिताभ बच्चन यांच्याकडून या निर्णयामागचे कारण जाणून घ्यायचे होते तेव्हा बिग बींनी मौन बाळगले आणि काहीही बोलण्यास नकार दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.