व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलतर्फे अमिताभ बच्चन पुरस्कार सलोनी साखरदांडे यांना

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) यांच्यातर्फे दिला जाणारा अमिताभ बच्चन मीडिया स्कॉलरशिप हा पुरस्कार सलोनी साखरदांडे यांना प्रदान करण्यात आला.

पणजी : व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) यांच्यातर्फे दिला जाणारा अमिताभ बच्चन मीडिया स्कॉलरशिप हा पुरस्कार सलोनी साखरदांडे यांना प्रदान करण्यात आला. मूल्यांकन प्रक्रियेनंतर फिल्ममेकिंगच्या पात्र विद्यार्थ्यास दरवर्षी मानाची ही शिष्यवृत्ती दिली जाते. 

कौशल्य, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती व इतर बाबींचा विचार करून ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पुढे जाऊन अधिकाधिक चांगले काम करण्यासाठीची प्रेरणा या शिष्यवृत्तीमुळे मिळते. डब्ल्यूडब्ल्यूआय यांनी समाजाच्या प्रगतीसाठी काम करत असताना, विविध उपक्रमांतून मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योगदान देण्यावर नेहमीच भर दिला आहे आणि त्यापैकी एक शिष्यवृत्ती आहे. डब्ल्यूडब्ल्यूआय कडून लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांच्यासह सुभाष घई, सुनंदा मुरली मनोहर अशा दिग्गजांच्या नावावर शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.

दरवर्षी डब्ल्यूडब्ल्यूआयतर्फे चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने शिष्यवृत्ती दिली जाते. या माध्यमातून सिनेमाशी संबंधित लोकांशी चर्चा कार्यशाळा, स्क्रिनिंग, प्रदर्शन आणि बरेच काही समजत मनोरंजन जग जाणून घेण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी इच्छुकांना एक व्यासपीठ उपलब्ध मिळते. हा पुरस्कार निर्माते आनंद पंडित यांनी सुरु केलेला आहे. डब्ल्यूडब्ल्यूआयच्या अध्यक्ष मेघना घई पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूडब्ल्यूआय यांच्यातर्फे सिनेमात काहीतरी वेगळे कारण इच्छिणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ दिले जाते. आम्ही नेहमीच युवकांनी या क्षेत्रात यावे आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून गुणवंत पात्र असलेल्यांना विविध शिष्यवृत्ती देऊन उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतो.

 

 

संबंधित बातम्या