Amitabh Bachchan यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 'जलसा' बाहेर चाहत्यांची गर्दी, बिग बींनीही सर्वांना दिले मोठे सरप्राईज

Amitabh Bachchan Birthay Special: अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर रात्री उशिरा चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak

गेल्या पाच दशकांपासून आपल्या चित्रपटांनी आणि आपल्या खास शैलीने लोकांच्या हृदयावर राज्य करणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज 80 वर्षांचे झाले आहेत. वाढदिवसानिमीत्त त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.बिग बींनीही मोठ्या मनाने त्यांच्या चाहत्यांना असे सरप्राईज दिले ज्याची त्यांना अपेक्षाही नसेल.

अमिताभ बच्चन त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday Special) त्यांच्या चाहत्यांना भेटतात. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शतकातील मेगास्टार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील (Movie) सर्वात मोठा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्यांच्या जुहू बंगल्याच्या बाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्टारचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचला. अशा परिस्थितीत बिग बींनी त्यांची निराशा न करता, त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हसू आणत तेथे जमलेल्या त्यांच्या चाहत्यांचे अभिनंदन आनंदाने स्वीकारले.
 

Amitabh Bachchan
Genelia And Riteish Deshmukh : जेनेलियाने रितेश देशमुखशी लग्न का केले? व्हिडीओ शेअर करत तिने सांगितले कारण

रात्री उशिरा जलसामधून बाहेर आल्यानंतर बिग बींनी चाहत्यांची भेट घेतली
अमिताभ बच्चन आपल्या सर्व चाहत्यांना हसतमुखाने भेटण्यासाठी बंगल्यातून बाहेर येताच तिथे जमलेल्या त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकाने आपापल्या शैलीत त्यांना 80 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन यांनीही आपल्या चाहत्यांचे तितक्याच मनापासून आभार मानले आहेत. यावेळी चाहत्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर वाढदिवसाचा केकही कापला. मुलगी श्वेताही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अमिताभ आणि श्वेता व्यतिरिक्त, यावेळी बिग बींची नात नव्या नवेली देखील दिसली, जी तिच्या आजोबांच्या वाढदिवसाशी संबंधित हे सुंदर क्षण तिच्या मोबाईल फोनवरून कॅप्चर करताना दिसली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com