Amitabh Bachchan: "मला देणगी मागायची लाज वाटते"

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 मे 2021

अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला. निधी उभारणे हे काम खरोखर उत्तम आणि कौतुकास्पद आहे. परंतु मी कधीही ही हे काम स्वतःहून सुरू करणार नाही, कारण मला पैसे मागायची लाज वाटते, पैसे मागणे मला लाजिरवाणे वाटते.

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा(Covid-19 India) वाढता प्रसार बघता अनेक देशांकडून मदत मिळत आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे देशातील लोक स्वत: च्या पद्धतीने होइल तशी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फिल्मस्टार्सनीही(Bollywood) या दिशेने पाऊल टाकले आहे. काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी दिल्ली मधील रकब गंज गुरुद्वारामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी(Covid Care Center at Ganj Gurdwara) दोन कोटी रुपयांची मदत केली होती. त्यावेळी  बिग बींनी(Big B) ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताला मदत करण्याची विनंती केली होती. दरम्यान, मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही त्याचे योगदान दिले असून फॅन्स त्यांचे कौतुक करीत असल्याचे आपल्याला दिसतच आहेत.(Amitabh Bachchan I am ashamed to ask for donations)

'पैसे मागायची लाज वाटते'
अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला(Amitabh Bachchan Blog) ज्यामध्ये त्यांनी दिलेल्या मदतीबद्दल नमूद केले. त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'निधी उभारणे' हे काम खरोखर उत्तम आणि कौतुकास्पद आहे. परंतु मी कधीही ही हे काम स्वतःहून सुरू करणार नाही, कारण मला पैसे मागायची लाज वाटते, पैसे मागणे मला लाजिरवाणे वाटते.  मी एकट्याने 25 कोटी दान केले आहेत.' अमिताभ बच्चन पुढे लिहितात, 'मी माझ्या देणगीबद्दल किंवा माझ्या ब्लॉग पोस्टमध्ये केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगत नाही जेणेकरुन लोक माझे कौतुक तुम्ही केले पाहीजे असेही मला वाटत नाही, परंतु मला यातून खात्री करुन घ्यायची आहे की लोकांना खरोखरच मदत मिळाली आहे की नाही का फक्त मोठ मोठे आश्वासनंच दिले जात आहेत. मी माझ्या मर्यादित स्त्रोतांद्वारे मला जे काही शक्य आहे ते करीत आहे.'

Sherni First Look : विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शीत 

'वेलफेयरसाठी नाही मागितले क्रेडीट'
त्यांनी पुढे लिहिले, 'आजवर मी केलेल्या लोककल्याणासाठी मी कुठल्याही थेट क्रेडीटची मागणी केली नाही. जर असे कुठे आपल्याला आढळले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'

मेक्सिकोची अँड्रिया मेझा ठरली विश्वसुंदरी 2021 

अमिताभ यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला
रविवारी बिग बी यांनीही कोरोना लसीचा दुसरा डोस(Amitabh Bachchan Vaccine)  घेतला. लस घेताना त्यांनी आपले फोटो शेअर केले आणि त्यासाठी मजेदार कॅपश्नही लिहिले. बिगने लिहिले की, 'आणखी दुसरा ही डोस झला आहे. कोविडचा, क्रिकेट नाही. यानंतर, त्यांनी हसणार्‍या इमोजीसह , सॉरी, सॉरी हे खूप वाईट होते,' असे लिहिले.  गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर आणि ब्लॉगवर आपल्या कोरोना लसीच्या पहिल्या डोसबद्दल माहिती दिली. 

संबंधित बातम्या