Amitabh Bachchan: पुढच्या जन्मात बिग बी अमिताभ बच्चन यांना व्हायचे आहे पत्रकार

कौन बनेगा करोडपतीमध्ये आलेल्या स्पर्धेकाने घेतली अमिताभ बच्चन यांची मुलाखत
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Dainik Gomantak

'कौन बनेगा करोडपती' आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे समीकरण प्रत्येक भारतीयाच्या मनात घट्ट झाले आहे. या प्रश्नोत्तरावर आधारित हा टेलेव्हिजन शो अमिताभ बच्चन यांच्यामुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो. शो दरम्यानचे अनेक किस्से, घटना समोर येत असतात. बिग बी बच्चन शोमध्ये येणाऱ्या स्पर्धेकांसोबत संवाद साधतात तसेच, अनेक विनोद करताना दिसतात. अलिकडे झालेल्या अका एपिसोडमध्ये बिग बींनी आपल्याला पत्रकार व्हायची इच्छा व्यक्त केली.

Amitabh Bachchan
New Cricket Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल, 01 ऑक्टोंबरपासून होणार नवे नियम लागू

झाले असे की, पत्रकार वैष्णवी कुमारी 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) च्या आगामी भागात एक स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. याचा प्रोमो सोनी टिव्हीतर्फे प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रमोत स्पर्धक बिग बींची एक छोटीशी मुलाखत घेताना दिसत आहेत. पत्रकार स्पर्धेकाने घेतलेल्या मुलाखती दरम्यान अमिताभ बच्चन घाबरलेले दिसत आहेत.

स्पर्धेक वैष्णवी, 'मी आजवर कुठल्याही अभिनेत्याची मुलाखत घेतली नाही. माझ्यासमोर बिग बी बसले आहेत, त्यामुळे मला तुमची मुलाखत घ्यायची आहे.' अशी इच्छा वैष्णवी व्यक्त करते. त्यावर बच्चन मी पत्रकरांना घाबरतो असे उत्तर देतात. त्याही पुढे जात अमिताभ बच्चन म्हणातात की त्यांनाही पुढच्या आयुष्यात पत्रकार व्हायचं आहे. “पुढच्या आयुष्यात आपणही पत्रकार व्हावे जेणेकरुन आपल्याला फक्त प्रश्नच विचारता येतील बाकी काही नाही. हे देवा, मला वाचव." असे अमिताभ बच्चन म्हणातात. आणि सर्व प्रक्षेक हसू लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com