बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली; शस्त्रक्रियेची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्विटर तर कधी ब्लॉग्जच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. गेल्या एका वर्षाचा काळ हा बॉलिवूडसाठी वाईट काळ ठरला आहे. हे वर्ष सुरू होते न होते, तोच आणखी एक वाईट बातमी आली आहे. ती म्हणजे, बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची. 

मुंबई :  बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्विटर तर कधी ब्लॉग्जच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. गेल्या एका वर्षाचा काळ हा बॉलिवूडसाठी वाईट काळ ठरला आहे. हे वर्ष सुरू होते न होते, तोच आणखी एक वाईट बातमी आली आहे. ती म्हणजे, बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची. मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून ही बातमी दिली आहे. अमिताभ यांच्या पोस्टवरून असे दिसते की त्यांची तब्येत खूपच खराब आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. 

Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट गाणार स्पेशल सॉंग, भंसाली स्वत: करणार कंपोजिंग

अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ताज्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की त्यांची तब्येत खूपच खराब आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमधील एका ओळीत अमिताभ यांनी लिहिले, "वैद्यकीय परिस्थिती ... शस्त्रक्रिया ... काहीही लिहू शकत नाही". ही पोस्ट पाहिल्यानंतर अमिताभचे चाहते खूप दु:खी आहेत. अमिताभ यांनी आपल्या तब्येतीच्या अनिश्चिततेकडे लक्ष वेधून आपल्या  ट्विटर आणि इंस्टाग्रामवर प्रश्नचिन्हांसह पोस्ट देखील शेअर केली आहेत. 

'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर अमिताभ यांची तब्येत अत्यंत नाजूक राहिली आहे आणि वेळोवेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील वर्षी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वाढदिवसा दिवशी उर्वशी रौतेलाने कापले चक्क 10 किलो कांदे

संबंधित बातम्या