"लॉकडाऊन लग्न चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला" 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

 सुमित संघमित्रा दिग्दर्शीत  "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

पुणे :  डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर निर्माते किरण कुमावत,अमोल कागणे,गौरी पाठक हे पुन्हा एखदा नव्या धाटणीचा,नव्या कोऱ्या संकल्पनेसहं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशा पध्दतीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येण्यास सज्ज झाले आहेत.

 सुमित संघमित्रा दिग्दर्शीत  "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.परंतु या दिग्गज कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात आहेत.लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची कथा सुमित संघमित्रा आणि सागर पाटक यांनी आपल्या मजेदार शैलीने साकारली आहे. या चित्रपटातील कथेला या चित्रपटातील गाण्यांनी या लग्नकथेला साज चढवाला आहे.लॉकडाऊनमधील मजेदार अनुभवांनी युक्त असा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस,त्याचबरोबर लेखन कौशल्यपणा लावत लेखक निर्मात्यांनी धाडसी विषय हाताळला आहे.याशिवाय निर्माता अमोल कागणेचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसानिमित्त गणपती बप्पाच्या आशिर्वादाने त्यांनी चित्रपटाचा शुभारंभ केला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या