अमरीश पुरी यांना बनायचे होते नायक, बनले 'सुपर खलनायक'

अमरीश पुरी यांना कधीही खलनायक बनायचे नव्हते.
अमरीश पुरी यांना बनायचे होते नायक, बनले 'सुपर खलनायक'
Amrish PuriDainik Gomantak

Amrish Puri: गदर चित्रपटातील 'अश्रफ अली' असो, करण अर्जुनचा 'ठाकूर' असो किंवा 'मिस्टर इंडिया मोगॅम्बो' असो, दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका आपण कधीच विसरुच शकत नाही. बॉलिवूडमधील अव्वल खलनायकांची यादी केल्यास अमरीश पुरी यांचे नाव अग्रक्रमाने लिहिले जाईल. कारण त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक आक्रमक खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांना 'सुपर खलनायक' म्हटले जाते. दुसरीकडे मात्र, अमरीश पुरी यांना कधीही खलनायक बनायचे नव्हते. (amrish puri wanted to become hero but because of this reason he became villain)

अमरीश पुरी यांना खलनायक व्हायचे नव्हते

चित्रपटात (Movie) काम करण्याचे स्वप्न घेऊन अमरिश पुरी (Amrish Puri) जेव्हा मुंबईत (Mumbai) आले तेव्हा त्यांन 'हिरो' व्हायचे होते. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून ते खलनायक झाले.

Amrish Puri
हार्ट अरिथमियाच्या समस्येमुळे दीपिका रुग्णालयात, नेमकी काय असतात 'या' आजाराची लक्षणं

तुमचा चेहरा हिरोसारखा दिसत नाही

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जाते की, अमरीश पुरी यांच्यापूर्वी त्यांचे दोन मोठे भाऊ मदन पुरी आणि चमन पुरी चित्रपटांमध्ये काम करायचे. या दोघांमुळे अमरीश पुरी यांना सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका मिळू लागल्या. त्यातूनच त्यांच्या मनात हिरो बनण्याचे विचार रुंजी घालू लागले.

Amrish Puri
Anil Kapoor Video: 'माझी आईही माझ्यासाठी कपडे शिवायची' म्हणत भावूक झाले अनिल कपूर

दुसरीकडे, असे म्हणतात की, आता ते जेव्हा निर्मात्यांकडे हिरोच्या भूमिकेसाठी विचारायला जायचे तेव्हा त्यांना पाहून ‘तुझा चेहरा हिरोसारखा दिसत नाही’ असे चित्रपट निर्माते म्हणायचे. अमरीश पुरी हे ऐकून खूप निराश व्हायचे. मात्र अमरिश पुरी यांना खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या, ज्या त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या की, ते प्रसिध्द खलनायक म्हणून ओळखले जाऊ लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com