Actress Beaten by Boyfriend : अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मारहाणीचे फोटो पोस्ट करताच साऊथ इंडस्ट्री हादरली..

साऊथच्या या अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडने केलेल्या मारहाणीचे फोटो व्हायरल केले आहेत.
Actress Beaten by Boyfriend
Actress Beaten by BoyfriendDainik Gomantak

South Actress Anicka Vikramman Accuses Ex-Boyfriend Of Physical Torture: सध्या इन्स्टाग्रामवर एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचे जखमी फोटो व्हायरल होत आहेत. दक्षिणात्य अभिनेत्री अनिका विजयी विक्रममनने अलीकडेच सोशल मीडियावर खुलासा केला की तिला तिच्या माजी प्रियकराने निर्दयीपणे मारहाण केली.

तिचे फोटो पाहुन झालेली मारहाण किती भयानक होती याची कल्पना येऊ शकते.  तिने तिच्या जखम झालेल्या चेहऱ्याचे आणि शरीराचे फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

अनिकाने दावा केला की तिच्या आधीच्या प्रियकराने गेल्या अनेक वर्षांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तिच्या चेहऱ्यावर झालेल्या जीवघेण्या जखमा आणि डोळ्याभोवती रक्ताची गुठळी दाखवणारे तिचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि चिंताही झाली आहे

सोमवारी, अनिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा चेहरा आणि तिच्या शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झालेली दिसत आहे . त्यासोबत तिने लिहिले की, “या घटनांना मागे टाकूनही मला धमकीचे कॉल येत आहेत आणि मला आणि माझ्या कुटुंबाला सतत बदनाम केले जात आहे.

माझ्या आधीच्या प्रियकराने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी शेवटचा फोटो क्लिक केला होता. मी या आठवड्यापासून इंस्टा वर फोटो पोस्ट करणे सुरू करेन. 

तिच्या पोस्टमध्ये, तिने फरार असलेल्या तिच्या आधीच्या प्रियकराच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केल्याची माहिती देणारी एक नोट देखील शेअर केली आहे. तो तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सतत धमक्या देत असल्याचा आरोपही तिने केला.

अनिकाने खुलासा केला की ती अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात होती आणि ते बऱ्याच काळापासून डेटिंग करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता. 

“तो माझ्याशी असे करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. जेव्हा मला दुसऱ्यांदा मारहाण झाली तेव्हा मी बेंगळुरू पोलिसांत तक्रार दाखल केली. 

Actress Beaten by Boyfriend
Manisha Koirala Celebrates Holi : मनिषा कोईरालाने नेपाळमध्ये साजरी केली होळी ...

चेन्नईत माझी पहिल्यांदा माझी चूक झाली. तो माझ्या पाया पडून रडला. तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरले. मी या घटनेची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले तर पोलिस मला सोडून देण्यास सांगतील, हा विचार करून त्याने मला मारहाण केली. त्याचे कारण म्हणजे त्याने पोलिसांना पैसेही दिले होते,” अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अनिका दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि ती प्रामुख्याने तमिळ चित्रपटांमध्ये काम करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com