रिलायन्सची मोठी घोषणा; आता अंबानींची नवी एंटरटेनमेंट कंपनी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

अनिल अंबानी यांची रिलायन्स एंटरटेनमेंट कंपनी ‘सूर्यवंशी’ आणि ‘'83’ या दोन पूर्ण झालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त असताना कंपनीने आज बुधवारी एका नव्या कंपनीची घोषणा केली.

मुंबई: अनिल अंबानी यांची रिलायन्स एंटरटेनमेंट कंपनी ‘सूर्यवंशी’ आणि ‘'83’ या दोन पूर्ण झालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त असताना कंपनीने आज बुधवारी एका नव्या कंपनीची घोषणा केली. रिलायन्स एंटरटेनमेंटने 'द गर्ल ऑन द ट्रेन' चे दिग्दर्शक रिभू दासगुप्ता सोबत एक नवीन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन कंपनी ‘हैंगर’ या चित्रपटाच्या नावाने ओळखली जाणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टातली रिलायन्स एंटरटेनमेंट ही पहिली फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे जिने सक्षम दिग्दर्शकांशी थेट भागीदारी करून लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवणे आणि मधु मन्तेना यांच्या सहाय्याने या कंपनीने फैंटम या फिल्म कंपनीची स्थापना केली होती. रिलायन्स कंपनीची  रोहित शेट्टीसोबत रोहीत शेट्टी पिक्चर्स ही कंपनी आहे. आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यासोबत रिलायन्सने विंडो सीट फिल्म्स नावाची एक कंपनी तयार केली आहे. दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपटांसाठी रिलायन्सने वाई नॉट स्टुडिओ ही संयुक्त कंपनी स्थापन केली आहे.

आज बुधवारी त्याच दिशेने एक पाऊल पुढे टाकत रिलायन्स एंटरटेन्मेंटने फिल्म हैंगर नावाची कंपनी स्थापन केली. रिलायन्सने नुकताच रिभू दासगुप्ता यांच्यासमवेत 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट या महिन्यात थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा, आदिती राव हैदरी आणि कीर्ती कुलहरी हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

"'तीन' चित्रपटाच्या दिवसापासून रिभू दासगुप्ता आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक वेगळीच खळबळ उडवत असतात. आता फिल्म हैंगरच्या माध्यमातून गर्दीपासून वेगळे होवून हटके चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. प्रेक्षकांना अडचणीत आणू शकेल अशा चित्रपटांना घेवून आमचा पुढे जाण्याचा मानस आहे आणि या भागीदारीतून आम्हाला असेच हटके चित्रपट बनवायचे आहेत," असे रिलायन्स एंटरटेनमेंटचे ग्रुपचे सीईओ रिभू दासगुप्ता यांनी सांगितले.

 

 

संबंधित बातम्या