अंकिता लोखंडे गोव्यात करणार बॅचलर पार्टी

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबतच्या (Vicky Jain) लग्नामुळे खूप चर्चेत आहे.
अंकिता लोखंडे गोव्यात करणार बॅचलर पार्टी
Ankita Lokhande is preparing to rock before marriage, will do bachelor party in Goa?Dainik Gomantak

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबतच्या (Vicky Jain) लग्नामुळे खूप चर्चेत आहे. अंकिता डिसेंबरमध्ये विकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे पण त्याआधी तिला तिच्या बॅचलरहुडचा आनंद घ्यायचा आहे. लग्नापूर्वी तिने धमाका करण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अंकिता गोव्यात (Goa) बॅचलर पार्टी साजरी करण्याच्या तयारीत आहे.

लग्नापूर्वी अंकिता करणार बॅचलर पार्टी

रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडेच्या जवळच्या मित्राने माहिती दिली आहे की, अभिनेत्री लग्नापूर्वी गोव्यात तिची बॅचलर पार्टी साजरी करणार आहे, ज्यात तिचे जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच अंकिता गोव्यात खूप मस्ती करणार आहे. अंकिताने तिच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी वृत्तांवर विश्वास ठेवला तर अंकिता 12 डिसेंबरला लग्न करणार आहे.

Ankita Lokhande is preparing to rock before marriage, will do bachelor party in Goa?
सत्यमेव जयते 2 मधील 'कुसु-कुसु' गाणे नोरा फतेहीने 37 तासांत केले शूट

मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे त्यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत. या हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी रूमही बुक करण्यात आल्या आहेत. हा विवाह सोहळा 12 ते 14 डिसेंबर म्हणजेच तीन दिवस चालणार आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची यादीही तयार करण्यात येत असून लवकरच सर्वांना लग्नाचे निमंत्रण पाठवले जाणार आहे.

अंकिता आणि विकी पारंपारिक समारंभात विवाहबद्ध होतील, त्यानंतर एक भव्य रिसेप्शन होईल जिथे अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. लग्नापूर्वी संगीत सोहळाही होणार आहे. लग्नाची तयारीही जोरात सुरू आहे, यापूर्वी अंकिताने तिच्या पादत्राणांचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये एका जोडीवर 'ब्राइट टू बी' असे लिहिले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com