मला का शिव्या शाप दिला जातो? म्हणत अंकिताने शेअर केल्या सुशांतसोबतच्या खास गोष्टी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा रंगली. ज्यात अंकिता लोखंडे सोबत झालेल्या ब्रेकअपचीही चर्चा होती.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा रंगली. ज्यात अंकिता लोखंडे सोबत झालेल्या ब्रेकअपचीही चर्चा होती. या दोघांचा ब्रेकअप 2016 मध्ये झाला होता. त्या काळात अशीही बातमी आली होती की दोघांचे लग्न होऊ शकते परंतु नंतर दोघांनीही आपआपला मार्ग धरला आणि वेगळे झाले. अलीकडेच अंकिता लोखंडे सुशांतच्या ब्रेकअपवर उघडपणे बोलली आहे. हा ब्रेकअप तीच्यासाठी किती कठीण होता आणि ती आपले आयुष्य संपविण्याचा विचार का करू लागली होती. ब्रेकअप दरम्यान ते दोघे कशा विषयी बोलत होते हे देखील तीने सांगितले.(Ankita Lokhande is openly talking about the breakup with Sushant Singh Rajput)

माझ्याबद्दल कोणालाही काही माहिती नाही

अंकिता लोखंडेने सांगितले की, 6 वर्ष एकत्र नात्यात असल्यानंतर सुशांतसोबत तीचा ब्रेकअप झाला होता. "आज लोक मला येवून बोलतात की तु सुशांतला  सोडले.  हे तुम्हाला कसे माहित आहे? माझ्याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. सुशांत ... मी इथल्या कोणावरही दोष देत नाही. मला वाटते की त्याने आपली निवड अगदी स्पष्ट केली होती. त्याला त्याच्या करियरमध्ये पुढे जायचे होते. त्याने आपले करिअर निवडले आणि तो पुढे गेला. पण अडीच वर्षे मी बर्‍याच गोष्टींशी झगडत राहिले,"असे अंकिताने बॉलीवुड बबलशीकेलेल्या संभाषणादरम्यान सांगितले.(Ankita Lokhande is openly talking about the breakup with Sushant Singh Rajput)

माझे आयुष्य संपले मी संपले

अंकिताचे म्हणणे आहे की, ती त्या लोकांसारखी नाहीये ज्यांना सहज पुढे जाणे सोपे आहे. "हे माझ्यासाठी खूप कठीण होते परंतु माझे कुटुंब माझ्याबरोबर उभे होते. माझे आयुष्य मला  संपल्यासारखे वाटत होते. मला पुढे काय करावे हे माहित नव्हते. अशा वेळी आपल्या मनात अनेक विचार येतात. मला माझे आयुष्य संपवावेसे वाटत होते. मी कोणाला ही दोष देत नाही. त्याने आपला मार्ग निवडला आणि मी त्याला तो पूर्ण अधिकार दिला, हे तुझ आयुष्य आहे आणि तु पुढे जाऊ शकतो. या सगळ्या प्रकारानंतर मी आणखी मजबूत बनत गेले," असे अंकिता म्हणाली.

मी कुठे चूकीची सिद्ध होते?

यापूर्वीही अंकिताने इन्स्टाग्राम लाईव्ह येवून ट्रोल करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिले होते. 'प्रत्येकाचे स्वतःच्या जीवनाचे हेतू असतात, सुशांतला नेहमी आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा होती आणि त्यानेही तेच केले. तो गेला, त्याच्यासाठी मी कोठे चुकीचे  सिद्ध होते? मला का शिव्या शाप दिला जातो? मी काय चूक केली आहे? जर तुम्हाला माझ्याबद्दल माहित नसेल तर मला दोष देणे थांबवा,"असे अंकिताने सांगितले.
 

संबंधित बातम्या