93 व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा

93 व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा
Announcement of 93rd Oscar nomination

2021 च्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची नुकतीच यादी जाहीर करण्यात आली आहे. लंडनमध्ये प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांनी नामांकीत सिनेमांची घोषणा केली. 93 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये प्रियांका चोप्राच्या 'द व्हाइट टाइगर' या चित्रपटालादेखील नामांकन मिळाले आहे. दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांची यादी फेब्रुवारीमध्ये जाहीर होते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा मार्चमध्ये पार पडला आहे. तर 25 एप्रिलला ऑस्कर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशन सोहळ्य़ामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांनी तूफान धमाल केली. सोहळ्यानंतर प्रियांका आणि निक जोन्स यांचे फोटो समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल होत आहेत. निक जोन्सने फोटो शेअर ट्विट करत एक जकास पोस्ट लिहिली आहे. ''मला आज सकाळी या सुंदर महिलेसोबत ऑस्कर नॉमिनेशन करता आले. जिने 'द व्हाइट टाइगर' चित्रपटाची निर्मीती केली आहे. या सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मी 25 एप्रीलला भेटेन प्रियांका’’, अशा आशायाचे ट्विट निकने केले आहे.

निकच्या ट्विटला रिट्विट करत प्रियांकाने म्हटले, ''माझं स्वत:च ऑस्कर..तुझ्यासोबत हे क्षण शेअर करणं खूप छान होतं... आय लव्ह यू निक.. 25 तारखेला ऑस्कर सोहळा पार पडेल’’ असं ट्विट तिने केले आहे.

ऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार मानला जातो. विविध कॅटेगरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रियांका चोप्रा लवरकच विन्फे यांच्या टॉक शोमध्ये झळकणार आहे. या शोबद्दल अनेकांची उत्सुकता ताणली आहे.


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com