कलाकारांच्या फोटो पोस्टवरती अन्नू कपूर भडकले

दैनिक गोमंतक
रविवार, 23 मे 2021

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) खूप अ‍ॅक्टिव असतात. बर्‍याच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यासाठीही ते ओळखले जातात. आता अलीकडे अन्नू कपूर सेलिब्रेटींविषयी बोलले आहेत.  अन्नू कपूर म्हणाले की ''जे कलाकार सुट्टीमध्ये सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत करतात. जर कलाकार सुट्टीवर गेले असतील तर मला काही हरकत नाही. परंतु त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन दिखावा करू नये. देशात कोरोनो विषाणूविरूद्ध लढा सुरूच आहे''.(Annu Kapoor flared up on the artist's photo post)

Fitness Video: पाहा मंदिरा बेदीचा "हँडस्टँड" करतांनाचा व्हीडीओ

अन्नू कपूर यांनी अशा प्रकारच्या सेलिब्रिटींवर राग व्यक्त केला आणि म्हणाले, ''तुम्ही भुकेलेल्या माणसांसमोर 56 पदार्थांची एक प्लेट खात आहात. आमहाला माहिती आहे तुम्हाला ते परवडू शकते, माहिती आहे की तुम्ही पैसेवाले आहात, आपण श्रीमंत आहात. आम्हला माहित आहे की आपल्याकडे सुंदर शरीर आहे.  परंतु हे दाखविने चांगले नाही. एक जर्मन संज्ञा आहे - किट्स'. याचा अर्थ असा आहे की आर्ट इन बॅड टेस्ट." ते पुढे म्हणाले की सेलिब्रिटींनी 'संवेदनशील' व्हावे आणि काही 'सहानुभूती' दाखवायला हवी. त्याचबरोबर सोशल मीडियावर सेलेब्रिटींच्या सुट्टीतील फोटोंकडे लक्ष देणाऱ्या लोकांवरही अन्नू यांनी टीका केली आहे.

एप्रिल 2020 मध्ये अन्नू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये लिहिले होते की ''जेव्हा जगातील बहुतेक भाग साथीच्या आजाराने ग्रस्त आहे तेव्हा, मी सर्व श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींना विनंती करतो की त्यांनी त्यांचे सुट्टीतील फोटो पोस्ट करू नये. अन्नू कपूरपूर्वी श्रुती सेठ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी मालदीवहून फोटो पोस्ट केल्याबद्दल अनेक सेलिब्रिटींवर रोष व्यक्त केला होता.

 

 

संबंधित बातम्या