HBD Anupam Kher : सारांशचा म्हातारा ते कश्मिर फाईल्सचा जबरदस्त अभिनय...अनुपम खेर म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ

कित्येक चित्रपटांमधुन त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
Anuam Kher Birthday Special
Anuam Kher Birthday Special Dainik Gomantak

अभिनेते अनुपम खेर सतत चर्चेत असणारे आणि अभिनयाचं एक विद्यापीठ म्हणावं असं व्यक्तिमत्व. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनयाचा प्रवास पाहुया जवळपास चार दशके भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यापासून ते अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधुन जागतिक कीर्ती मिळवण्यापर्यंत, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या कामाचा नेहमीच त्यांच्या चाहत्यांना अभिमान वाटला आहे. 

नकारात्मक भूमिका असो किंवा कॉमिक भूमिका असो किंवा एखादी गंभीर भूमिका असो,अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या स्टाईलमधुन आपलं अष्टपैलु कलाकार असणं वेळोवेळी सिद्ध केलं आहे

सारांश

मंगळवारी ते 68 वर्षांचा होत असताना, आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवणाऱ्या त्यांनी साकारलेल्या पात्रांची पुन्हा एकदा भेट घेऊया.'सारांश'ने अनुपम खेर यांची मोठ्या पडद्यावर सुरूवात झाली . खेर यांनी 28 व्या वर्षी बी.व्ही. प्रधान या 65 वर्षीय व्यक्तीची मुख्य भूमिका साकारली होती. महेश भट्ट यांनी 1984 च्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. खेर यांची जोडी रोहिणी हट्टंगडी यांच्या बरोबर होती. 

या चित्रपटात रोहिणी यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ही कथा एका वृद्ध जोडप्याची होती ज्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. चित्रपटाचे कथानक मुंबईत घडते. त्यात सोनी राजदान, मदन जैन, निळू फुले आणि सुहास भालेकर हे कलाकारही होते.

कर्मा

कर्मा चित्रपट प्रदर्शित होऊन 37 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत खेर यांच्या विरोधी डॉ डॅंगची भूमिका त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. 

सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार, नसीरुद्दीन शाह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी आणि पूनम ढिल्लन यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाद्वारे खेर यांनी हे सिद्ध केले की ते नकारात्मक भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीने करू शकतात.

अ वेन्सडे

अ वेन्सडे हा बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात खेर आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात, शाह एका अज्ञात सामान्य माणसाची भूमिका साकारत आहे जो दहशतवाद्यांना मुंबईच्या वेगवेगळ्या भागात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देऊन त्यांची सुटका करून घेतो. 

तो दहशतवाद्यांना त्यांच्याच औषधाची चव देतो. खेर एका वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले जो किलरचा माग काढण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली.

Anuam Kher Birthday Special
Aditya- Karan Conflict : शाहरूख- राणीच्या त्या इंटिमेट सीनमुळं आदित्य चोप्रा आणि करण जोहरमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं

द कश्मिर फाईल्स

विवेक रंजन अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा 2022 च्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक होता. या चित्रपटात खोऱ्यातील बंडखोरीदरम्यान काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची आणि वेदनांची कथा दाखवण्यात आली होती. 

खेर यांनी द काश्मीर फाईल्समध्ये पुष्कर नाथ पंडित यांची भूमिका साकारली आणि त्यांच्या ताकदीने भरलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सर्वत्र कौतुक मिळाले. चित्रपटातील 67 वर्षीय अभिनेत्याचे नाव त्याचे दिवंगत वडील पुष्कर नाथ यांच्या नावावर ठेवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com