अनुपम खेर म्हणाले, "आता चंद्रावर राहणारेसुद्धा देतील 'सूर्यवंशम'च्या या प्रश्नाचं उत्तर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत जे टीव्हीवर बर्‍याचदा प्रसारित केले जातात. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही हे चित्रपट पहायला आवडतात. यात अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे.

मुंबई :  बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत जे टीव्हीवर बर्‍याचदा प्रसारित केले जातात. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही हे चित्रपट पहायला आवडतात. यात अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. तथापि, हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा टीव्हीवर बऱ्याचदा दाखवला जातो. या चित्रपटावर अनेक प्रकारचे विनोद आणि मीम्सदेखील बनविले जातात. आता अलीकडेच सोनी मॅक्सने सूर्यवंशम चित्रपटाबाबत एक ट्विट केले असून अनुपम खेरने या ट्विटला मजेशीर प्रतिसाद दिला आहे. सूर्यवंशम हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट सोनी मॅक्स चॅनलवर दाखवला जाणार होता. याच्या प्रमोशनसाठी चॅनलने "हिरा आपल्या वडिला ठाकूर भानु प्रताप सिंग यांचे मन जिंकेल का?", असे ट्विट केले.

हे ट्विट बघून ज्येष्ठ कलाकार अनुपम खेर यांना त्यांचे हसू आवरता आले नाही. याला रिप्लाय देताना त्यांनी ट्विट केले, "मेरे प्यार सोनीमॅक्स 2 मूव्हीज वालो तुमचा हा प्रश्न पाहून मला हसू येणे थांबले नाही. हा चित्रपट इतक्या वेळा दाखवला गेला आहे की आता चंद्रावर राहणारे लोक देखील या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात."या ट्विटवर अनुपम खेरच नाही तर सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Friendship Teaser: क्रिकेटनंतर हरभजन लगावणार अभिनयात चौके छक्के

'वाचू शकत नाही, लिहू शकत नाही'; बिग बीं नी डोळ्याच्या शस्त्रक्रियाबद्दल व्यक्त केल्या भावना

एका वापरकर्त्याने लिहिले, 'आत्मा विषारी खीर खाईल काय…. रात्री 7 वाजता पहायला विसरू नका.", त्याच वेळी एकाने लिहिले, "मुलांच्या परीक्षेत हे विचारले जावे". 'सूर्यवंशम' च्या रिलीझच्या वेळी सेटमॅक्स वाहिनीने या चित्रपटाच्या प्रसारणाचे 100 वर्षांचे अधिकार विकत घेतले होते. यामुळेच अभिनेत्री सौंदर्या  आणि अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट टीव्हीवर पुन्हा पुन्हा दाखवला जातो.  अनुपम खेरदेखील या चित्रपटात एक गंमतीदार भूमिकेत दिसले होते.

संबंधित बातम्या