The Vaccine war : 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटात आता अनुपम खेर दिसणार?

बहुचर्चित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटात आता अभिनेते अनुपम खेर दिसणार आहेत
Anupam Kher
Anupam Kher Dainik Gomantak

'द कश्मिर फाईल्स' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा 'द वॅक्सिन वॉर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासुन त्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं शुटिंग पुर्ण झालं असुन आता प्रेक्षकांना यातल्या कलाकारांविषयी प्रचंड आकर्षण वाटत आहे.

आता अनुपम खेर हेही या चित्रपटात महत्त्वाची भूमीका करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेते अनुपम खेर यांचा 'द वॅक्सिन वॉर' हा 534 वा चित्रपट असणार आहे. अनुपम खेर यांनी स्वत: ही माहिती आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर हे मुख्य भूमीकेत असणार आहेत. या चित्रपटाचं शुटिंग उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये सुरू असल्याची माहिती मिळाली होती. नाना पाटेकर या चित्रपटात आहेत ही बातमी मिळाल्यानंतर फॅन्समध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं. नानांच्या नंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे या चित्रपटात दिसणार असल्याने ही तगडी स्टारकास्ट काहीतरी भन्नाट दाखवणार यात शंका नाही.

Anupam Kher
Urfi Javed - Chitra Wagh मी जेलमध्ये जायला तयार आहे ;पण आधी तुमची...ऊर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान..

विवेक अग्नीहोत्री यांच्या पत्नी पल्लवी जोशी या 'द वॅक्सिन वॉर'च्या निर्मात्या आहेत. हा चित्रपट ' स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ या दिवशी हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यांसह १० हून अधिक भाषांमध्ये रिलीज होईल.'द कश्मिर फाईल्स' नंतर आता हा चित्रपट त्याची कथा याविषयी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. यापुर्वी विवेक अग्निहोत्री यांचा 'द ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट आला होता, त्याही चित्रपटाला चांगले यश मिळाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com