अनुराग कश्यप म्हणाले, निर्माते 'बॉयकॉट'ला घाबरतात, मृत्यूच्या 2 वर्षांनंतरही सुशांत सिंह राजपूत...

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकत आहेत.
Anurag Kashyap
Anurag KashyapDainik Gomantak

हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) काही प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकत असल्याचे समोर येत आहे. यामुळे अनेक कलाकार घाबरले असतानाच चित्रपट निर्मातेही चिंतेमध्ये आहेत. असाच एक चित्रपट निर्माता म्हणजे अनुराग कश्यप (Anurag Kashyap), तो म्हणतो की त्याला कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक राजकीय मुद्द्यावर चित्रपटासाठी निर्माते मिळत नाही आहेत. (Anurag Kashyap says filmmakers are afraid of boycott)

Anurag Kashyap
Comedian Raju Srivastava रुग्णालयात दाखल,जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका

चित्रपटावर बहिष्कार टाकला जाण्याची भीती सर्वांनाच लागली आहे. अनुरागने सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) सोशल मीडियावरती आतापर्यंत टॉप ट्रेंडमध्ये असल्याबद्दल सांगितले आहे. अनुराग म्हणाला की, आपण सर्वजण अशा विचित्र काळात जगत आहोत ज्यामध्ये प्रत्येकाचा बहिष्कारच होत असतो.

प्रोड्यूसर्स घाबरले आहेत

लाल सिंह चड्ढा असो की रक्षाबंधन, बॉलीवूड चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून बहिष्कार टाकला जात आहे. आता या मुद्द्यावर अनुराग कश्यप बोलले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना अनुराग कश्यप म्हणाले की, “आज जर मला ब्लॅक फ्रायडे किंवा गँग्स ऑफ वासेपूर बनवायचे असते तर मला वाटत नाही की मी ते बनवले असते, कारण मी अनेक स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत ज्यावर कोणी प्रोड्यूसर पैसे गुंतवायला तयार नाहीये.

राजकारण किंवा धर्माशी निगडित असलेले चित्रपट दुरूनही कुणी घ्यायला तयार नाहीये. अनुराग म्हणाले की, भीतीपोटी कोणीच चित्रपटाची निर्मिती करत नसेल तर चित्रपट कसा बनवणार? आजच्या काळात तुम्हाला काही सांगायचे असेल तर चित्रपट कसा बनवणार?

Anurag Kashyap
Laal Singh Chaddha रिलीज होण्यापूर्वी आमिर खानने बायकॉट ट्रेंडवर मौन सोडत म्हणाला...

सुशांतचा उल्लेख केलास का?

अनुराग कश्यप म्हणाले की, देशातील जनता आज बहिष्काराने घेरली आहे. ते म्हणाले की, आपण खूप लाइफ टाईममध्ये जगत आहोत मृत्यूच्या दोन वर्षांनंतरही सुशांत सिंग राजपूत अजूनही दररोज ट्रेंडमध्ये आहे.

प्रत्येकावर बहिष्कार टाकला जात असताना ही एक विचित्र वेळ येत आहे. राजकीय पक्ष, भारतीय क्रिकेट संघ, सर्वांनाच बहिष्काराचा सामना करावा लागत आहे जर तुमचा बहिष्कार झाला नाही तर तुम्ही निरुपयोगी आहात. तसेच अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com