Anurag Kashyap son-in-law : अनुराग कश्यपचा होणारा जावई कोण आहे? चला जाणुन घेऊया शेन ग्रेगोयरबद्दल..

दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
Anurag Kashyap son-in-law
Anurag Kashyap son-in-lawDainik Gomantak

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आता लवकरच आपल्या जावयाचं स्वागत करणार आहे. अनुरागची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण आता आलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

आलियाने 20 मे रोजी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत एंगेजमेंट केली. याची माहिती खुद्द आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. आलिया तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीबद्दल खूप आनंदी आहे. ही बातमी कळल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, अनुराग कश्यपचा भावी जावई शेन ग्रेगोयर कोण आहे आणि तो काय करतो?

आलियाची इन्स्टाग्राम पोस्ट

आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की आलिया तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना रोमँटिक पद्धतीने किस करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कपल खूप आनंदी दिसत आहे.

त्याचवेळी, ही बातमी ऐकून चाहते देखील खूप आनंदित झाले आहेत आणि या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय आलियाच्या वडिलांनीही यावर कमेंट करत लिहिले - 'अभिनंदन.' याशिवाय अनन्या पांडेने लिहिले - 'ओएमजी'.. तर अभिनेत्री जान्हवी कपूरने यावर आश्चर्य व्यक्त करत लिहिले - 'क्या...'. इंडोनेशियाच्या बाली शहरात दोघांची एंगेजमेंट झाली.

कोण आहे अनुरागचा जावई शेन ग्रेगोयर

अनुराग कश्यपचा भावी जावई 23 वर्षांचा असून तो व्यवसायाने अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचे ते संस्थापक आहेत. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साउंड डिझायनिंग आणि म्युझिक प्रोडक्शन्स स्कील्स डेव्हलप करते.

आलिया अनेकदा शेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आलिया आणि शेन गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आलिया 22 वर्षांची आहे आणि व्यवसायाने व्लॉगर आहे. ती अनेकदा यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत असते. आता हे जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

आलियाची पोस्ट

पोस्ट करत आलिया कश्यपने लिहिले - 'असं झालं! माझ्या जिवलग मित्राला, माझ्या जोडीदाराला, माझ्या सोबत्याला! तू माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम आहेस..बिनशर्त प्रेम कसे असते हे मला दाखविल्याबद्दल धन्यवाद..आता मी माझे उर्वरित आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही माझ्या प्रिय...मी तुझ्यावर नेहमी प्रेम करीन... आलिया आणि शेनचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com