Video: अनुष्काने शेअर केल्या मालदीवमधील सोनेरी आठवणी

Anushka Sharma latest Video: अनुष्का मालदीवमध्ये वामिकासोबत सायकल राईड करत सुट्यांचा आंनद घेतांना दिसत आहे.
Video: अनुष्काने शेअर केल्या मालदीवमधील सोनेरी आठवणी
Anushka Sharma latest VideoInstagram

अनुष्का शर्माची मालदीवची सुट्टी संपली आहे. विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत काही निवांत क्षण घालवून अनुष्का मायदेशी परतली आहे. भारतात परतताच अनुष्काला मालदीवमध्ये घालवलेले क्षण आठवत आहेत. सुंदर क्षणांची आठवण करून देत अनुष्काने मालदीवचा एक न पाहिलेला व्हिडिओही शेअर केला आहे. (anushka sharma shares maldives memories virat kohli vamika kohli News)

अनुष्काने शेअर केलेला व्हिडिओ
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. तिने मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करून चाहत्यांना व्हर्च्युअल टूरही करून दिली आहे. त्याचवेळी मालदीवमधून परतल्यानंतर अनुष्काने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये (Video) अनुष्का वामिकासोबत सायकल चालवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अनुष्काला वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये सायकल चालवताना पाहून असे वाटते की, हे तिचे आवडते काम आहे. या कौटुंबिक सुट्टीचा आनंद तिने खूप एन्जॉय केल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, माझ्या दोन प्रिय व्यक्तींसोबतच्या सर्वोत्तम आठवणी आहेत. तिने एका छोट्या कॅप्शनद्वारे सांगितले की ती प्रत्येक क्षण विराट आणि वामिकासोबत मोकळेपणाने आणि आंनदाने जगते.

चाहत्यांची प्रतिक्रिया
अनुष्का शर्मा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करा आणि चाहते प्रतिक्रिया देत नाहीत, असे कधीही होऊ शकत नाही. अनुष्काने मालदीव प्रवासाचा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया वर्षाव होत आहे. अनुष्का आणि वामिकाचे सायकलिंग व्हिडिओ यूजर्सना खूप आवडतात. कुणी व्हिडीओला क्यूट म्हटले तर कुणी कौतुकात शब्द कमी पडत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com