The Archies First Look: सुपरस्टारचे स्टार किड्स आले समोर, बीग बींनी केले अभिनंदन

द आर्चीज हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे.
The Archies First Look: सुपरस्टारचे स्टार किड्स आले समोर, बीग बींनी केले अभिनंदन
The ArchiesDainik Gomantak

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात अगस्त्य नंदा, किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहेत. तिघेही दिग्दर्शक झोया अख्तरच्या 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटात दिसून येणार आहेत. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होतो. आता चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे. झोया अख्तरने नेटफ्लिक्सवर या आगामी चित्रपटाशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. (The Archies First Look Superstar Star Kids came forward Big Bean congratulated)

The Archies
बॉलिवूड, हॉलिवूड की दाक्षिणात्य चित्रपट? कुणी गाजवले बॉक्स ऑफिसवर वर्चस्व

आर्चिसचा फर्स्ट लुक आला समोर

हा व्हिडीओ चित्रपटाच्या स्टार्सचा परिचयाचा करून देणारा आहे. व्हिडिओमध्ये अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर चित्रपटातील बाकीच्या तरुण स्टार्ससोबत मस्ती करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये सर्व तरुण सेलेब्स हसताना, उड्या मारताना आणि नाचताना दिसत आहेत. कोणी गिटार वाजवत आहेत तर कोणी फुगे फोडत आहे. कुणी सायकलवरून सगळे मिळून पिकनिक करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी दिला आशीर्वाद

व्हिडिओमध्ये अभिनेता डॉट, मिहिर आहुजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्यासह अगस्त्य, सुहाना आणि खुशी देखील दिसून येणार आहे. सर्व रेट्रो कपड्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. झोया अख्तरने सांगितले होते की ती तिच्या मूळ शैलीत द आर्चीज देखील बनवणार आहे. या चित्रपटात मौजमजेसोबतच रहस्यही दडलेल आहे. तसेच, अमिताभ बच्चन आपल्या नातवाच्या पदार्पणाने खूप खूश आहेत. त्यांनी अगस्त्य नंदा याचेही अभिनंदन केले.

The Archies
Birthday Special: जाणून घ्या सचिन खेडेकरांचा सिनेसृष्टीतला प्रवास

द आर्चीज चित्रपटाचे पोस्टर अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्राम हॅडलवर शेअर केले आहे. त्यासोबत बीग बींनी लिहिले की, 'आणखी एक सकाळ, माझा नातू. मी अगस्त्या तुला आशीर्वाद देतो. तुझ्यावर माझं प्रेम आहे. आठवणींमध्ये हरवायला तयार व्हा झोया अख्तरचा द आर्चीज हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.