अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर अर्जून कपूर नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

सध्या गोव्यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर अर्जुन कपूर नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आजरा बीचजवळील आलिशान बंगल्यामध्ये सध्या त्या दोघांचा मुक्काम आहे.

पणजी: सध्या गोव्यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर अर्जुन कपूर नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आजरा बीचजवळील आलिशान बंगल्यामध्ये सध्या त्या दोघांचा मुक्काम आहे. मलायकाची बहिण अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडाकचा हा बंगला असून अर्जुन कपूरने सोमवारी गोव्यातील या बंगल्यामध्ये काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  तेव्हा  “शकील लडाक आणि अमृता अरोरा तुम्ही खूपच सुंदर घर बांधले आहे. गोव्यात यापेक्षा चांगले हॉलिडे होम असू शकत नाही” अर्जुनने असे कॅप्शन दिलेल्या या फोटोची अमृता आणि तीचा नवरा शकील लडाक ने प्रशंसा केली आहे.

मुंबईत आपल्या कुटुंबीयांसोबत नाताळ सण साजरा केल्यानंतर मलायका आणि अमृता या अरोरा सिस्टर गोव्याला गेल्या. अर्जुनच्या या पोस्टवर मलायका आणि अमृता या दोघींनी हार्टचा इमोजी टाकला आहे. अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचं नातं मीडियापासून नेहमीच लपवून ठेवलं होतं. पण हल्ली ते दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र बघायला मिळतात. आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करतांना आणि त्यावर कमेंटही करतांना दिसतात.

आणखी वाचा:

कोरोना ची कहानी ‘लेट्स राईज अगेन -

संबंधित बातम्या