अर्जुन कपूरच्या मेहनतीला यश; सिक्स पॅक अॅब्सवर चाहत्यांची खिळली नजर

Arjun Kapoor Transformation : 15 महिन्यांच्या प्रवासामध्ये अर्जुन कपूर स्वत:मध्ये मोठा बदल केला आहे.
अर्जुन कपूरच्या मेहनतीला यश; सिक्स पॅक अॅब्सवर चाहत्यांची खिळली नजर
Arjun Kapoor Transformation Dainik Gomantak

बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी अर्जुन कपूरने आपल्या वाढत्या वजनावर मात करत हँडसम हंक बनून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता तोच अर्जुन कपूर पुन्हा एकदा आपल्या परिवर्तनाच्या प्रवासाने सर्वांना चकित करत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्जुन कपूर त्याचे सिक्स पॅक अॅब्स दाखवले आहेत. या पोस्टमध्ये अर्जुन कपूरने एक लांब आणि रुंद कॅप्शन लिहून आपला 15 महिन्यांचा परिवर्तनाचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासोबतच आपली शर्टलेस स्टाईल दाखवून लाखो सौंदर्यवतींची मनेदेखील जिंकली आहेत. (Arjun Kapoor Transformation inspired by malaika arora)

Arjun Kapoor Transformation
केसांना दही लावा आणि तासाभरात फरक अनुभवा!

मलायका अर्जुन कपूरच्या आयुष्यात आल्यापासून तिने त्याचा कायापालट केला आहे. याआधी अर्जुन कपूरच्या बहिणीचा प्रवास लोकांना आश्चर्यचकित करणारा होता. तर त्याचवेळी अर्जुन कपूरही सिक्स पॅक अॅब्स बनवून स्वत:मध्ये बदल करण्यात गुंतला आहे.

त्याबाबत पोस्ट करत अर्जुन कपूरने आपल्या या प्रवासाचे कौतुक केले असून आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अर्जुन कपूरच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेम दाखवले आहे. तर त्याचवेळी काही चाहते अर्जुन कपूरच्या फिटनेसचे श्रेय मलायका अरोराला देत आहेत. अर्जुन कपूरच्या या फोटोवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. त्याचा हा बदल पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरेही त्याच्यावर खिळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.