अभिनेता शेखर सुमनने केले शाहरुख खानचे समर्थन

हिंदी चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता शेखर सुमनने शाहरुख खान आणि गौरी खान यांना पाठिंबा देत आर्यन खानच्या अटकेच्या दरम्यान आई-वडील म्हणून दोघांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे असं म्हणले आहे.
अभिनेता शेखर सुमनने केले शाहरुख खानचे समर्थन
Aryan Khan Case : Actor Shekhar Suman supports Shah Rukh Khan Dainik Gomantak

हिंदी चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता शेखर सुमनने (Shekhar Suman) शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान यांना पाठिंबा देत आर्यन खानच्या (Aryan Khan) अटकेच्या दरम्यान आई-वडील म्हणून दोघांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे असं म्हणले आहे. अभिनेता शेखर सुमनने म्हटले आहे की, शाहरुख खान आणि गौरी खान यांना होणारा त्रास पाहून खूप दुःख होत आहे कारण त्यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही. शेखरने खुलासा केला आहे की; शाहरुख खान अभिनेता हा एकमेव होता ज्याने त्याच्या 11 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर वैयक्तिकरित्या त्याच्याशी संपर्क साधला होता.

शाहरुख आणि कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी ट्विटरवर पोस्ट लिहित शेखरने , "मी शाहरुख आणि गौरी खान ची अवस्था समजू शकतो, एक पालक म्हणून ते कोणत्या अवस्थेतून जात आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. पालकांसाठी या प्रकरणातून जाणे सोपे नाही. ही त्यांच्यासाठी एक अग्नि परिक्षाच आहे"

त्यांनी पुढे शाहरुख खान बद्दल लिहिले जेव्हा त्याने आपला मुलगा आयुष कोवळ्या वयात गमावला. त्यांनी ट्विट केले, “जेव्हा मी 11 वर्षांचा माझा मोठा मुलगा आयुष गमावला तेव्हा शाहरुख खान हा एकमेव अभिनेता होता जो मी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत असताना वैयक्तिकरित्या माझ्याकडे आला, आणि मला आधार दिला .

दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या पाटणा घरी वडील के.के.सिंह यांना भेटण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी शेखर यांचा समावेश होता. त्याबद्दल बोलताना त्याने आपल्या चाहत्यांना आठवण करून दिली, “मी सुशांतच्या वडिलांना ओळखत नव्हतो, पण तरीही त्याने आपला मुलगा गमावला होता आणि याचं दुख मला माहीत आहे; म्हणून मी करोना असताना सुद्धा माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांची भेट घेतली

ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अद्याप जामीन मिळालेला नाही. आर्यनला क्रूज पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि त्याच्याकडे बोर्डिंग पास किंवा कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते, असे त्याचे वकील सतीश मनेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले होते. त्याने असेही म्हटले आहे की त्याच्या ताब्यात काहीही सापडले नाही. निव्वळ बदनाम करण्याच्या हेतूने हा जाणीवपूर्वक केलेला प्लान आहे.

Related Stories

No stories found.