नेटकऱ्यांचा संताप; आर्यन खान होतोय ट्रोल

नुकत्याच NCB च्या झालेल्या केस मुळे आर्यन खान चांगलाच चर्चेत आला होता, या प्रकरणामध्ये त्याला न्यायालीन कोठडी मिळाली दरम्यान; तो एनसीबीच्या ताब्यात असताना कारमध्ये हसताना दिसला
नेटकऱ्यांचा संताप; आर्यन खान होतोय ट्रोल
Aryan Khan NCB CaseDainik Gomantak

नुकत्याच NCB च्या झालेल्या केस मुळे आर्यन खान (Aryan Khan) चांगलाच चर्चेत अल होता, या प्रकरणामध्ये त्याला न्यायालीन कोठडी मिळाली दरम्यान; तो एनसीबीच्या ताब्यात असताना कारमध्ये हसताना दिसला, यावर लोकांनी संताप व्यक्त करत त्याला फटकारले; शिवाय अजूनही नशा उतरली नाही अशी कॉमेंट केली.

Aryan Khan NCB Case
वर्षा उसगावकर नंतर गोव्यातून मयांका परेरा करतेय स्वप्नांचा पाठलाग

अश्या परिस्थितीत आर्यन खानचा आनंदी चेहरा लोकांना खटकला आर्यन खानला एनसीबीच्या कारमध्ये हसताना पाहून लोकांचा पारा चढला आहे, त्याच्या शिक्षेत वाढ झाली या मागे त्याचे असे निर्ढावलेले वागणे तर नसेल ना आस प्रश्न लोकाना पडला आहे. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्स नेहमीच चर्चेत असतात.लोकांच्या नजरा नेहमी त्याच्यावर असतात. या सुपरस्टरची मुले सुद्धा यातून सुटू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या प्रकरणामुळे सर्वांच्या नजरा आर्यन खानवर आहेत. त्याच्या प्रत्येक हालचाली लोकांकडून नोंदवल्या जात आहेत. काल संध्याकाळी आर्यन खान एनसीबी कारमध्ये बसून हसताना दिसला.

Aryan Khan NCB Case
फेसबुकमुळे सयानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी

हा न्यायालयाबाहेर काढलेला फोटो पाहून लोक संतापले आणि आर्यन खानला बोलू लागले. आर्यन खानवर टीका करणारे लोक म्हणतात की श्रीमंतांच्या मुलांचे काहीही झाले तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतच. त्यांना माहित आहे की त्यांना काहीही होणार नाही, म्हणूनच ते गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत. एका चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले की, 'शाहरुख खान आम्ही तुमचे चाहते होतो पण तुम्ही आम्हाला निराश केले.' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'तो अटकेमध्येही हसत आहे, मला धक्का बसला आहे.'

लोक ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत,त्या खरोखरच धक्कादायक आहेत कारण हे चित्र समोर येण्यापूर्वी ट्विटरवर लोक आर्यन खानच्या बाजूने लिहित होते. दरम्यान, या एका फोटोने संपूर्ण कथा बदलली आहे. आता लोक आर्यन खानला बिघडलेले मूल समजत आहेत.

Related Stories

No stories found.