आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

17 व्या आरोपी अचित कुमारला (Achit Kumar) मुंबईतील न्यायालयाने 9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
Aryan Khan
Aryan KhanDainik Gomantak

बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपाखाली २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज आर्यनची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यामुळे आर्यनला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे आर्यनच्या वकिल सतिश मानेशिंदे यांनी पुन्हा एकदा जामीन मंजूर करणारी याचिका दाखल केली होती. यावर एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. दरम्यान सुनावणीअखेर न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि त्यांच्याबरोबरच्या सहा जणांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. या ड्रग्ज प्रकरणात आणखी तपास गरजेचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान चौकशीच्या आधारावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता घेवून कोठडी आवश्यकत असल्याचेही यावेळी न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

Aryan Khan
आर्यन खानच्या प्रकरणात किंग खानने शेवटच्या क्षणी रद्द केले जाहिरातीचे शूटिंग

दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची कोठडीही संपत आहे. न्यायालयाने दुपारी तिघांनाही हजर करण्यात आले होते. त्यातच अरबाज मर्चंटच्या वकिलाने न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. तसेच दुसरी याचिका वकिलांनी न्यायालयात दाखल केली असून त्यामध्ये अनसीबीच्या तपासावर सवालही उपस्थित केले आहेत.

Aryan Khan
एनसीबी कोठडीत शाहरुखचा मुलगा वाचतोय विज्ञानाची पुस्तके

आर्यनच्या वकिलांनी न्यायालयामध्ये नेमके काय म्हटले?

आर्यन खानचे वकिल सतिश मानेशिंदे यांनी न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान आपली नाराजी व्यक्त केली आहे. आर्यनच्या वक्तव्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून गेटवरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची एनसीबी अधिकाऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. या प्रकरणात पहिल्या दिवशी, आम्ही आर्यन खानच्या रिमांडसाठी तात्काळ सहमत झालो होतो. आम्ही विचार केला होता की, तपासामध्ये काही तरी विकास होईल. मात्र त्यामध्ये काही आर्यनच्या अटके व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही घडले नाही. काल जेव्हा अर्चित कुमारला झाली तेव्हा त्यांनी मर्चंट आणि आर्यन खान याच्याशी संबंध आहे किंवा नाही ते तपसायला पाहिजे. मात्र यामध्ये असे काही झाले नाही, असेही आर्यनचे वकिल सतिश मानेशिंदे यांनी न्यायालयात म्हटले.

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी (Mumbai Case) 7 ऑक्टोबरपर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कोठडीत ठेवले. आर्यनचीही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानला इतर आरोपींसह एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे. आर्यनच्या कुटुंबाकडून अन्न पुरवण्याची मागणी करण्यात आली होती, ती नाकारण्यात आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि गौरी देखील आर्यनला भेटायला आले होते. या दरम्यान, गौरीने आर्यनसाठी बर्गर आणला होता पण एनसीबीने त्याला ते देऊ दिले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com