Aryan Khan ड्रामा-कॉमेडी मालिकेतून करणार सिनेक्षेत्रात पदार्पण

आर्यन खान एका वेब सीरिजचं लेखन करत आहे. तो दोन-तीन महिन्यांत लेखनाचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Shah Rukh Khan & Aryan Khan
Shah Rukh Khan & Aryan KhanDainik Gomantak

Aryan Khan Bollywood Entry: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेही सिनेविश्वात प्रवेश केला आहे. आर्यन खान हा मोठ्या पडद्यावरचा अभिनेता नसून तो कॅमेऱ्याच्या मागे काम करणार स्टार आहे. हा मुद्दा त्यांने आधीच स्पष्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखचा मुलगा आर्यन खान एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे. आर्यन खान एका वेब सीरिजचं लेखन करत आहे. तो दोन-तीन महिन्यांत लेखनाचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यन खान एक कॉमेडी वेब सिरीज लिहित आहे

मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, आर्यन खान एका कॉमेडी वेब सीरिजमध्ये काम करत आहे. या कॉमेडी वेब सिरीजमध्ये एका अभिनेत्याचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे, जो मुंबईत त्रस्त होऊन पुढे जाण्यासाठी काम करतो. वेब सीरिजची कथा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी असेल. तसंच त्यात कॉमेडी आणि धमाल-मस्तीची छटा असणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023 च्या पहिल्या तिमाहीत आर्यन खानच्या या वेब सीरिजवर काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वेब सिरीजबाबत फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, वेब सीरिजची निर्मिती रेड चिलीज करणार आहे.

Shah Rukh Khan & Aryan Khan
Siddharth Kiara Chat: सिद्धार्थ मल्होत्रा ​​अन् कियारा अडवाणीची चॅट झाली व्हायरल, म्हणाली 6 वाजता...

शाहरुखही बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसणार आहे

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुखचा शेवटचा चित्रपट आनंद एल रायने दिग्दर्शित केला होता. शाहरुख पाच वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. 2023 मध्ये, शाहरुख खानचे तीन बॅक टू बॅक सिनेमे रिलीज होणार आहेत, ज्यात अटली कुमारचा जवान, राजकुमार हिरानीचा डंकी आणि सिद्धार्थ आनंदचा पठाण यांचा समावेश आहे. शाहरुख खानचा जब हॅरी मेट सेजल, झिरो आणि फॅन बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

Shah Rukh Khan & Aryan Khan
Siddharth Kiara Chat: सिद्धार्थ मल्होत्रा ​​अन् कियारा अडवाणीची चॅट झाली व्हायरल, म्हणाली 6 वाजता...

दरम्यान शाहरुखची मुलगी सुहानाही झोया अख्तरच्या द आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एकूणच, शाहरुख खानचा मुलगा आर्यन त्याच्या नव्या प्रवासाला सुरवात करणार आहे. याआधी आर्यन खानचे नाव वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर त्याला तुरुंगात जावे लागले होते. आणि दिवसानंतर त्याला कोर्टाकडून क्लिन चिट मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com