आर्यन खानची आजची रात्रही कोठडीतच, उद्या होणार सुनावणी

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आर्यन खानची आजची रात्रही कोठडीतच, उद्या होणार सुनावणी
Aryan Khan's bail hearing postponed till tomorrow, will remain in jail even today Dainik Gomantak

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे, आर्यन खानला आजही जामीन मिळाला नाही आणि त्याला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागेल. इतर आरोपींनाही त्यांच्यासोबत तुरुंगात राहावे लागेल.यापूर्वी न्यायालयाने तीन आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला आहे. आता गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.

Aryan Khan's bail hearing postponed till tomorrow, will remain in jail even today
सैफ अली खानने 10 वर्षांनी लहान असलेल्या बेबोशी का केलं लग्न, स्वतः केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आजकाल अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे सतत चर्चेत असतो. आर्यनच्या जामिनाची सुनावणी सत्र न्यायालयात आज म्हणजेच बुधवारी सुरू होती. सतीश मानशिंदे आणि ज्येष्ठ वकील अमित देसाई न्यायालयात आर्यनच्या वतीने उलटतपासणी घेत होते. सतीश मानशिंदे यांनी रिया चक्रवर्तीची केस लढली आहे, तर अमित देसाई यांनी सलमान खानची केस लढली आहे.

आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली. आर्यनला 7 ऑक्टोबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. 11 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्यावर एनसीबीने कोर्टाकडून उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता. दुसरीकडे, अनेक बॉलिवूड कलाकार आर्यन आणि शाहरुखच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्याचा सिक्योरिटी इंचार्ज रवीही घटनास्थळी उपस्थित होता. चाहत्यांचे लक्ष आता आर्यनला जामीन मिळू शकतील की नाही आणि त्याला आणखी काही रात्री तुरुंगात काढाव्या लागतील याकडे लागले आहे. सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला शाहरुख खानन्नला भेटायला मन्नतला पोहोचले. सलमान वडील सलीम खान यांच्यासह मंगळवारी रात्री शाहरुखला भेटण्यासाठी गेला होता.

Related Stories

No stories found.