HBD: तुम्ही आता राखीला ट्रोल करता मात्र तिचे 'गरीब बालपण' आणेल तुमच्या डोळ्यात पाणी

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
HBD: तुम्ही आता राखीला ट्रोल करता मात्र तिचे 'गरीब बालपण' आणेल तुमच्या डोळ्यात पाणी
As a child, Rakhi Sawant used to feed herself by eating leftover food from neighbors' houseDainik Gomantak

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत आज मनोरंजन क्षेत्रा मधील एक प्रसिद्ध नाव आहे. राखी नेहमीच तिची कॉमेडी, तिचा डान्स आणि तिच्या स्वभावामुळे चर्चेत असते. मात्र, हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. हे सर्व तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे.

राखीने तिच्या आयुष्यात गरिबीपासून मारामारीपर्यंत अशा अनेक वेदनांचा सामना केला आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या अभिनेत्रीचे बालपण संघर्षाने भरलेले आहे. आज या अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला राखीच्या दुनियेची ओळख करून देणार आहोत

As a child, Rakhi Sawant used to feed herself by eating leftover food from neighbors' house
'संजीव कुमार' यांचा अभिनयातील प्रवास..

राखीचे आयुष्य संघर्षाने होते भरलेले

राखी सावंतने तिचे बालपण अत्यंत गरिबीत घालवले आहे जिथे तिला शेजाऱ्यांच्या उरलेल्या अन्नावर जगावे लागले. खरे तर राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. इंडस्ट्रीत येण्यासाठी अभिनेत्रीने तिचे नाव बदलले. राजीव खंडेलवालच्या जज्बात या शोमध्ये राखीने सांगितले की ती एका गरीब कुटुंबातील आहे, तिचे वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. तिच्या संघर्षाचे वर्णन करताना राखीने सांगितले की, तिच्या कुटुंबाला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले, ते रिकाम्या पोटी झोपायचे. कधी कधी शेजारी द्यायचे ते उरलेले अन्न कुटुंब खायचे.

राखीला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती. पण ती जेव्हा कधी नाचायची तेव्हा तिचे मामा तिला खूप मारायचे. मुलींना त्यांच्या कुटुंबात नाचण्याची परवानगी नसल्यामुळे तिला नाचण्यासाठी घरातील लोक मारहाण करत असत. राखीचे म्हणणे आहे की, तिला नेहमीच या इंडस्ट्रीचा एक भाग व्हायचे होते पण तिचे लग्न व्हावे असे तिच्या पालकांना वाटत होते. त्यामुळे तिने आई-वडिलांचे पैसे चोरून घरातून पळ काढला. घरातून पळून गेल्यानंतर राखीच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडले आणि तिला एकटं सोडलं.

कामासाठी स्वतःची शस्त्रक्रिया केली

राखीने इंडस्ट्रीत येण्यासाठी घर सोडले, पण तिला अभिनयाविषयी काहीही माहिती नाही, फोटोशूट केले नाही, अभ्यास केला नाही, आयटम साँग म्हणजे काय हे तिला माहीत नव्हते. अभिनेत्रीने सांगितले की, येथे येण्यासाठी तिला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. अनेकवेळा नकारांना सामोरे जावे लागल्यानंतर राखीने तिची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. राखीची 12 वर्षांपूर्वी नाक आणि स्तनाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर ती पुन्हा ऑडिशनसाठी गेली होती. यानंतर राखीला 'जोरू का गुलाम', 'जिस देश में गंगा रहता है' असे काही चित्रपट मिळाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com