'या' मराठी चित्रपटासाठी आशाताईंनी वयाच्या 88 व्या वर्षीही गायले गाणे

महेश टिळेकर (Mahesh Tilekar) दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ (HawaHawai) चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं आशाताईंनी गायलं असून, बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी मराठीसाठी पार्श्वगायन केलंय.
'या' मराठी चित्रपटासाठी आशाताईंनी वयाच्या 88 व्या वर्षीही गायले गाणे
Asha Bhosle sang a song for this Marathi film at the age of 88 Dainik Gomantak

अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या आणि आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा आवाज दिलाय. महेश टिळेकर (Mahesh Tilekar) दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ (HawaHawai) चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं आशाताईंनी गायलं असून, बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी मराठीसाठी पार्श्वगायन केलंय. ‘हवाहवाई’ चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाइंटीनाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

टिळेकर यांनीच लिहिलेल्या गाण्याचे बोल आहेत ‘जगण्याची ही मजा घेऊ या नव्याने...’ आशाताईंच्या सुमधुर आवाजात ते ध्वनिमुद्रित करण्यात आलंय. ‘हवाहवाई’ चित्रपटातील आशाताईंच गाणं ऐकून त्या 88 वर्षांच्या आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही इतकं त्यांनी ते अप्रतिम गायलंय.प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी आगामी मराठी चित्रपट हवा हवाईसाठी एक गाणे गायले आहे. आशा भोसले यांनी 2014 मध्ये एका मराठी प्रकल्पासाठी शेवटचे गाणे गायले जेव्हा त्यांनी मिस मॅच (2014) साठी आवाज दिला.

Asha Bhosle sang a song for this Marathi film at the age of 88
Birthday Special: आशा भोसले घरगुती हिंसाचाराला पडल्या होत्या बळी

'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' सारखी हजारो सुपरहिट गाणी देणाऱ्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि रेकॉर्ड आहेत.आशा यांनी 1943 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या आतापर्यंत सतत गात आहेत .

त्यांनी 1948 मध्ये चुनारिया चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये गायनाची सुरुवात केली. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी 'सावन आया' हे पहिले गाणे गायले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com