Iffi Goa: इफ्फीकडून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा गौरव; दाखवले जाणार तीन जुने चित्रपट

स्पॅनिश चित्रपट निर्माते, लेखक आणि छायाचित्रकार कार्लोस सौरा यांना यावर्षीचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार
Iffi Goa
Iffi GoaDainik Gomantak

Iffi Goa: पणजी, गोवा येथे 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होत आहे. इफ्फीत 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच, यावर्षीचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार स्पॅनिश चित्रपट निर्माते, लेखक आणि छायाचित्रकार कार्लोस सौरा यांना दिला जाणार आहे. याशिवाय ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री आशा पारेख यांचा देखील अनोख्या पद्धतीने गौरव केला जाणार असून, त्यांची प्रमुख भुमिका असलेले तीन चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. त्यामुळे सिनेरसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

Iffi Goa
IFFI: हृदयस्पर्शी 'धाबरी कुरुवी'; फक्त स्थानिक कलाकार असलेला भारतीय इतिहासातील पहिला चित्रपट

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. मुरुगन यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. महोत्सवात आशा पारेख यांच्या तीसरी मंझिल (1966), दो बदन (1966) आणि कटी पतंग (1971) हे तीन सिनेमे दाखवले जाणार आहेत. या तिन्ही सिनेमांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी महोत्सवात 221 भारतीय आणि 118 आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती डॉ. मुरुगन यांनी दिली आहे.

तसेच, मणिपूर चित्रपटसृष्टीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाच मणिपुरी चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत. यामध्ये इशानौ (द चोझन वन) आणि रतन थियाम – द मॅन ऑफ द थिएटर यासह पाच मणिपुरी चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात, चेल्लो शो (2021) आणि इंडिया लॉकडाउन हे दोन भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय NFDC द्वारे रिस्टोर केलेल्या पाच क्लासिक फिल्म दाखवल्या जाणार आहेत.

Iffi Goa
Horror Films at IFFI 53: इफ्फीत प्रदर्शित होणारे 'हे' हॉरर चित्रपट अजिबात चुकवू नका

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. यामध्ये गायिका लता मंगेशकर, गायक-संगीतकार बप्पी लाहिरी, कथ्थक वादक पंडित बिरजू महाराज आणि अभिनेते रमेश देव, टी. रामाराव आणि इतर कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. तसेच, आंतरराष्ट्रीय श्रद्धांजली विभागात, चित्रपट निर्माते पियर पाओलो पासोलिनी आणि जीन लुक गोडार्ड यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com