"बसायला खुर्च्या नाहीत, आवाज ऐकू येत नाही" तिकीटं फाडून फेकत ए.आर रहमानच्या फॅन्सनी कॉन्सर्ट सोडली

ए.आर रहमानच्या चेन्नईतील कॉन्सर्टवर चाहते भलतेच नाराज झाले आहेत.
A.R Rehman
A.R RehmanDainik Gomantak

Fans upset at AR Rahman's concert in Chennai : आपल्या जादूई संगीताने 3 दशके इंडस्ट्रीवर आणि जगावर गारुड घालणारा ऑस्कर विजेता संगीतकार म्हणजे ए.आर रेहमान.

दिलसे, गुरू, रांझना, हायवे, रोजा, बाँबे यांसारख्या चित्रपटांंमधुन आपल्या मंजूळ स्वरांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या ए.आर रेहमानची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे.

चेन्नईत लाईव्ह कॉन्सर्ट

ए आर रेहमानची चित्रपटातली गाणी तर प्रेक्षक तल्लीन होऊन ऐकत असतातच ;पण त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टलाही आवर्जून हजेरी लावत असतात. 10 सप्टेंबर रोजी रहमानच्या चाहत्यांनी आपला रविवार रहमानच्या सूरांसोबत साजरा करण्यासाठी चेन्नई गर्दी केली होती.

खराब व्यवस्थापन

रहमानच्या या लाईव्ह कॉन्सर्टला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. कार्यक्रम सुरू होताच अनेकांनी तक्रारी केल्या की त्यांना आवाज ऐकू येत नाही. व्यवस्थापनाच्या खराब साऊंड सिस्टीममुळे प्रेक्षकांना आवाज नीट येत नव्हता.

"कधीही कॉन्सर्टला येणार नाही"

अनेकांनी गर्दीमुळे पॅनीक अॅटॅक आणि अस्वस्थ झाल्याचा अनुभव शेअर केला. अनेकांनी असंही सांगितलं की ते एआर रहमानचे सर्वात मोठे चाहते असूनही ते कधीही कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार नाहीत. 

काहींनी तिकीटं फाडली

ज्यांनी तिकीटं काढून रविवारची संध्याकाळ रहमानच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवली होती अशा अनेक चाहत्यांनीही कार्यक्रमस्थळापासून दूर जाणे पसंत केलं. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार काहींनी रागाच्या भरात तिकीटेही फाडली

चाहत्यांच्या कमेंटस

लाईव्ह कॉन्सर्टला नाराज झालेल्या काही चाहत्यांचा एक व्हिडीओ एका फिल्म बिझनेस एक्सपर्टने शेअर केला. एका निराश फॅनने ,"#ARRahman #MarakkumaNenjam कॉन्सर्टची तिकिटे फाडली.

चाहत्यांच्या मते ही खरोखरच एक अविस्मरणीय घटना आहे आणि AR रहमानने लोकांना दिलेली सर्वात वाईट भेट आहे

" शोमधील आणखी एक व्हिडिओ शेअर करताना, एका नाराज चाहत्याने लिहिले, “खूप वाईट पद्धतीने आयोजित कॉन्सर्ट. 

पैसे वाया गेले

काही चाहत्यांनी त्यांचे पैसे वाया गेले म्हणत नाराजी व्यक्त केला. एकाने असेही म्हटले की विश्वासघाताची प्रचंड भावना जाणवली. 

एका चाहत्याने लिहिले आजूबाजूला होणार्‍या अनेक मारामारी आणि गोंधळामुळे मला चांगल्या व्हायब्सपेक्षा खूप तणाव वाटत होता! आवाज नीट येत नव्हता! #actcevents #MarakkumaNenjam #ARRConcert @arrahman.

एका विचित्र अनुभवासाठी

एका चाहत्याने असेही लिहिले, “या विचित्र दृश्यासाठी 15 हजार दिले. चेंगराचेंगरीत जवळपास मृत्यू झाला. प्रत्येक कोपऱ्यातून लोक ओसंडून वाहत होते. काही लोकांना बसायला खुर्च्याही नव्हत्या. ऑडिओही नीट नाही. @arrahman चांगले आयोजन. 

तुमच्या मैफिलीत कधीच जाणार नाही..”  असे सांगणाऱ्या चाहत्यांचेही व्हिडीओ शेअर केले आहेत

A.R Rehman
'जवान'मधला हॉस्पीटलच्या दुरावस्थेचा तो सीन उत्तरप्रदेशातल्या त्या घटनेवर आधारित? कोण आहेत डॉ. कफिल खान?

चाहत्याचं ट्वीट

ज्यांना बसायला जागा मिळाल्या त्यांनाही इतर अडचणींचा सामना करावा लागला. आपला अनुभव शेअर करताना एका व्यक्तीने ट्विट केले की, “. ए.आर. रहमान हा अक्षरशः एकमेव कलाकार आहे ज्याला मी शोधतो. तो माझ्यासाठी सर्वस्व आहे.

 मी त्याच्यावर मनापासून प्रेम करतो. मी तिकिटे विकत घेतली तरीही मला पूर्ण पॅनिक अॅटॅक आला असुन त्यांना ब्रेकडाउन झाला. इतरांनी काय केले याची मी कल्पना करू शकत नाही.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com