K.L Rahul -Athiya Shetty Wedding : K.L राहुल आणि अथियाच्या लग्नाचा अलिशान मंडप बघितला का?

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि सुनिल शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी या आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत
K.L Rahul 
Athiya Shetty
K.L Rahul Athiya ShettyDainik Gomantak

K.L Rahul -Athiya Shetty Wedding: बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनिल शेट्टीच्या लाडक्या लेकीचा लग्नसोहळा आता चांगलाच रंगला आहे. अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल हे याच आठवड्यात रेशीमगाठीत अडकणार आहेत

अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. अथिया आणि राहुल खंडाळ्याच्या फार्महाऊसवर लग्न करत आहेत, तिथून मंडपाचा व्हिडिओ समोर आला आहे.

अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (K.L Rahul) हे असेच एक जोडपे असणार आहे, जे पुन्हा क्रिकेट आणि बॉलीवूडच्या मिलनाचे साक्षीदार होणार आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 

अथिया आणि राहुल अतिशय साधेपणाने लग्न करण्याचा विचार करत आहेत. खंडाळ्यातील त्यांचे सजवलेले फार्महाऊस आणि त्यांच्या लग्नाच्या तयारीचे फोटोही समोर येत आहेत.

KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा सोहळा या आठवड्यात सुरू झाले आहेत आणि 23 जानेवारीला होणाऱ्या भव्य लग्नापूर्वी मेहेंदी, हळदी आणि संगीत समारंभाची योजना सुरू आहे. सुनील आणि माना शेट्टीचा खंडाळ्यातला भव्य बंगला हे लग्नाचे ठिकाण आहे आणि लग्नाची जोरदार तयारी केली जात आहे. 

सुनील शेट्टीच्या घरातूनही अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत, ज्यामध्ये लग्नाची झलक स्पष्ट दिसत आहे. काही काळापूर्वी मंडपाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो पूर्णपणे सजलेला आहे. हे पाहून लग्नाची थीम सोनेरी होणार असल्याचे दिसते.

K.L Rahul 
Athiya Shetty
Shahrukh Khan-Hemant Biswa: कोण शाहरुख खान? आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या प्रश्नावर फॅन्सनी काढली लाज..

अथियाला साधे लग्न करायचे असल्याने आणि केएल राहुललाही खंडाळा हवेलीत लग्न करायचे होते, सुनील शेट्टीने ठरवले की हेच ठिकाण असेल. लग्नासाठी योग्य असेल. रॅडिसन हॉटेलमध्ये पाहुण्यांची राहण्याची सोय केली जाईल. लग्नानंतर अथिया शेट्टी आणि केएल राहुल मुंबईत ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com