
Jawan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या जवान या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानने प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच अनेक रेकॉर्ड तयार केले आहेत. चित्रपटगृहात आल्यानंतर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. आता 'जवान'बाबत दिग्दर्शक अॅटलीने मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या सर्वाचे लक्ष ऑस्करवर आहे आणि मला जवानला ऑस्करमध्ये पाहायला आवडेल. याबाबत मी शाहरुखबरोबर चर्चा करेन असे अॅटलीने म्हटले आहे. याबरोबरच या चित्रपटाची कथा मी शाहरुखला २०२० मध्ये झूम कॉलद्वारे ऐकवली होती. तेव्हा शाहरुख आणि गौरी दोघांनाही ही कथा फार आवडली होती आणि शाहरुखने लगेच आपला होकारदेखील कळवला होता.
शाहरुखने नेहमीच चित्रपट 'लार्जर दॅन लाइफ' होण्यासाठी वेळोवेळी अनेक सूचना दिल्या आहेत. २०१९ मध्ये 'बिजिल' साठी काम करत होतो तेव्हा शाहरुखने मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली होती असे अॅटलीने म्हटले आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असून अॅटली चांगल्या कथेच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे.
जवानमध्ये शाहरुख डबर रोलमध्ये दिसून येत आहे. विक्रम सिंह राठोड आणि आझाद या दोन्ही भूमिका त्याने उत्तम निभावल्या असून चाहते त्याच्या अभिनयावर खूष झाले आहेत. भारत आणि भारताबाहेरुनदेखील शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
दरम्यान, 'जवान' में शाहरुख खानशिवाय नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणि, लहर खान, संजीता भट्टाचार्य आणि सुनील ग्रोवर हे कलाकार आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसत आहेत. अॅटली आपल्या दहा वर्षाच्या करिअरमध्ये ७ चित्रपट बनवले आहेत.
महत्वाचे म्हणजे त्याचे हे ७ ही चित्रपट हीट ठरले आहेत. ७ वा चित्रपट जवान आहे. जवानने 11 दिवसात देशभरात 477.63 कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात 860.30 कोटींचा गल्ला जमवल्याचे समोर आलेल्या रिपोर्टमध्ये दिसून येत आहे. आता जवान ऑस्करमध्ये जाणार का? जवान कमाईचे आणखी कोणते नवे विक्रम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.