'अतरंगी रे' ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित
'अतरंगी रे' ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित Dainik Gomantak

'अतरंगी रे' ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित

"अतरंगी रे' या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) उद्या म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा मोस्ट अवेटेड चित्रपट "अतरंगी रे' (Atrangi Re) ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षणकांसाठी एक आंनदाची बातमी आहे. 'अंतरंगी रे' हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित न होता OTT प्लटफॉर्म डिस्प्ले प्लस हॉटस्टारवर (Hotstar) प्रदर्शित होत आहे. अक्षय, धनुष आणि सारा यांनी सोशल मिडियावर (Social Media) चित्रपटामधील त्यांचे लुक दाखवून चाहत्यांना याची माहिती दिली. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तिघांच्या वेगवेगळ्या स्टाइल प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. आनंद एल राय या चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) उद्या म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये सारा आली खान रिंकूची भूमिका साकारणार आहे.तर धनुष विशु आणि अक्षय कुमार जादूगरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील् अक्षयने नावाबाबत खुलासा केलेला नाही. पोस्टरमधील तिन्ही पात्रांची वेगळी शैली आणि रूप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

* या तिन्ही कलाकारांनी त्यांच्या लूकसह एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे

साराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, आणि आता शेवटी रिकुला भेटण्याची वेळ आली आहे, तिला तुमचे सर्व प्रेम द्या आणि ती धन्यवाद म्हणेल. बिहारमधून आलेली ही छोरी या विचित्र प्रेमकथेचा केंद्रबिंदु आहे. पोस्टर शेअर करतांना धनुषने लिहिले- फर्स्ट लुक विशु आणि अक्षय त्यांचा लुक शेअर करतांना लिहितात - प्यार मे पागल एकतरंगीची कथा, तुमच्या या कथेत खरोखरच जादू आहे. हा चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार यांची माहिती नुकतीच समोर आली आहे.

* अशीच काहीशी या चित्रपटाची कथा

प्रथमच प्रेक्षकांना या स्टार्सची त्रिकुट पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या तिघांचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान या चित्रपटामध्ये धनुषच्या पत्नीची भूमिका साकारु शकते. पण चित्रपटात ट्विस्ट येतो तो जेव्हा सारा अली खान अक्षय कुमारच्या प्रेमात पडते. या चित्रपटात अक्षय कुमार एक बेफिकीर व्यक्तिरेखा आहे. असे बोलले जाते की सारा या चित्रपटामध्ये डबल रोल करणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com