Avatar 2 Teaser Trailer: 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, Pandora युद्धात काय असेल खास

हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'अवतार'चा सिक्वेल (Avatar 2) गेल्या 10 वर्षांच्या काळापासून प्रतीक्षेत आहे.
Avatar 2 Teaser Trailer: 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, Pandora युद्धात काय असेल खास
Avatar 2Dainik Gomantak

हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'अवतार'चा सिक्वेल (Avatar 2) गेल्या 10 वर्षांच्या काळापासून प्रतीक्षेत आहे. आता अखेर 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. त्याची पहिली झलक 27 एप्रिल रोजी लास वेगासमधील CinemaCon येथे दाखवण्यात आली होती आणि आता त्याचा ट्रेलर ऑनलाइन रिलीज करण्यात आला. (Avatar 2 Teaser Trailer After 10 years of waiting what will be special in Pandora War)

Avatar 2
संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

यावेळेस काय खास असणार आहे

मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही चाहत्यांना Pandora ग्रहांचे सुंदर नजारे पहायला मिळणार आहेत. मागील चित्रपटात नमूद केल्याप्रमाणे, Pandora हा अल्फा सेंच्युरीमधील एका ग्रहाचा चंद्रासारखाच उपग्रह आहे ज्यामध्ये पृथ्वीसारखीच सजीव आहेत. सॅम वर्थिंग्टन, नवी जेक सुली आणि जॉय सलडाना या चित्रपटात पुन्हा एकदा नेतिरीच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. यावेळी तो एकटा नसून त्याची मुलंही या चित्रपटात आहेत. Pandora चे सुंदर निळे पाणी संपूर्ण चित्रपटात दिसते आणि चित्रपट एक प्रकारे या कुटुंबाभोवती फिरत असल्याचे दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये नावीचा एक डायलॉग देखील आहे ज्यामध्ये तो म्हणतो, 'आम्ही जिथे जाऊ, तिथे हा परिवार आमचा किल्ला आहे'.

नवीन कलाकारांसह तो कधी रिलीज होईल?

चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन म्हणतात की यावेळी चित्रपट पाहणे अधिक मनोरंजक असेल कारण यात हाई डायनेमिक रेंज, हाई फ्रेम रेट, उच्च प्रतीचे रिझोल्यूशन आणि व्हिज्युअल इफेक्टसह 3D वापरण्यात आले आहे. केट विन्सलेट, मिशेल येहो, डेव्हिड थेवलीस आणि विन डिझेल हे देखील यावेळी चित्रपटात मागील कलाकारांसह दिसून येणार आहेत. हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषेत 16 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.