‘टायगर’ नावाची अफलातून कहाणी; जॅकी श्रॉफ यांनी आठवणींना दिला उजाळा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

2014 मध्ये हिरोपंती चित्रपटातून पदार्पण करणारा प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफचा आज 31 वा वाढदिवस आहे.

मुंबई : 2014 मध्ये हिरोपंती चित्रपटातून पदार्पण करणारा प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफचा आज 31 वा वाढदिवस आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा म्हणून ओळख निर्माण करण्य़ाऐवजी टायगरने स्वत:ची  वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगरने आपल्य़ा अ‍ॅक्शनपटातून आपल्य़ा अभिनयाची छाप पाडली. अभिनेत्री दिशा पटानीसोबत असणाऱ्या संबंधामुळे तो अनेकदा चर्चेतही राहिला. त्याचबरोबर तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतो ते म्हणजे त्याच्या नावामुळे टायगरचं खर नाव काय आहे, हे अजूनही अनेकांना माहीत नाही. मात्र जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत आपल्या मुलाच्या नावाचा किस्सा सांगितला.

जॅकी श्रॉफ यांनी टायगरला टायगर हे नाव कसं मिळालं याचा खुलासा केला. ‘टायगरचं खर नाव जय हेमंत श्रॉफ असल्याचं जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.’

चाहते पुन्हा पडणार गोविंदाच्या प्रेमात; 15 ते 16 गाणी स्वत:च लिहिली होती

त्यांनी टायगरच्या लहानपणीची आठवण सांगितली, ‘’जय लहान असताना घरातील सर्वांचा चावा घेत होता. त्यामुळे आम्ही त्याला लडिवाळाने माझा टायगर म्हणायचो. त्य़ामधूनच पुढे त्याला मी टायगर म्हणू लागलो. त्यानंतर त्याची पुढे ओळख टायगर या नावानेच झाली,’’ असं जॅकी श्रॉफ म्हणाले. मात्र आता संपूर्ण जग आता टायगरला टायगर म्हणून ओळखतं.

‘’माझे वडिल मला लहानपणी भीडू किंवा बच्चा असा नावाने आवाज देत. त्यांना हे दोन शब्द खूप आवडतात’’ असं टायगरने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘’टायगरने कोणत्या प्रकारचे चित्रपट निवडावेत किंवा कशाप्रकारे अभिनय कारावा याबद्दल मी कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही,’’ असंही जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. ‘’चित्रपटामधील अ‍ॅक्शन सिन्स पाहिल्यानंतर मी त्याच्याशी चर्चा करतो आणि काय आवडले नाही ते ही सांगतो’’ असं जॅकी श्रॉफ यांनी स्पष्ट केलं. 

संबंधित बातम्या