Brahmastraतील डायलॉगवर झालेल्या टीकेवर अयान मुखर्जीने मौन सोडत म्हणाला...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Brahmastra
BrahmastraDainik Gomantak

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाला पसंती मिळत आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली आहे. दोघांची केमिस्ट्री पसंत केली जात आहे. पण या चित्रपटातील डायलॉगवर टीका होत आहे. विशेषतः आलिया भट्टच्या डायलॉग्सवर टिका होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांनी चित्रपटावरील टीकेवर मौन सोडले आहे. याबाबत अयानने एका मुलाखतीत सांगितले आहे.

एका वृत्ताला मुलाखत देतांना अयानने या चित्रपटाविषयी सांगितले, अयानला जेव्हा ब्रह्मास्त्रच्या (Brahmastra) लेखन आणि डायलॉगवर होत असलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने विचारले की हे काही भागात किंवा संपूर्ण चित्रपटात (Movie) जाणवले? अयान म्हणाला- मला वाटते की यामुळे चित्रपटाला आत्मा मिळेल. बहुतेक एनर्जी तुमच्या आतून येते आणि जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा सर्वात जास्त एनर्जी असते. हे ऐकण्यापेक्षा कागदावर चांगले वाटते.

Brahmastra
Mahabharat Film साठी 700 कोटी रूपयांचे बजेट; अनेक बडे स्टार झळकणार

ब्रह्मास्त्रचे पहिले गाणे केसरियाचे उदाहरण देताना अयानने केसरियाबद्दल ही गोष्ट सांगितली आणि म्हणाला- जेव्हा त्याचे पहिले गाणे 'केसरिया' रिलीज झाले तेव्हा त्याला 'लव्ह स्टोरीज' या शब्दावरून टीकाही ऐकावी लागली. त्यानंतरही हे गाणे (Song) सुपरहिट झाले असून लोक त्याबद्दल फारसे बोलत नाहीत.

दुसरा भाग 2025 मध्ये होणार रिलीज

अयान मुखर्जीने चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ब्रह्मास्त्र 2 हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. ब्रह्मास्त्र बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर वर्ल्डवाइड या चित्रपटाने 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com