Doctor G Trailer: आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंगचा 'डॉक्टर जी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
Doctor G Trailer
Doctor G TrailerDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धम्माका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानच्या 'डॉक्टर जी' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'डॉक्टर जी'चा ट्रेलर पाहून खळखळून हसाल. आयुष्मानचा हा चित्रपट नेहमीप्रमाणे कॉमेडीसोबत सामाजिक परिस्थितीही दाखवत आहे. 'डॉक्टर जी' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' मध्ये स्त्रीरोग तज्ञाची भूमिका साकारत आहे.

आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वी रिलीज झाला आहे. सुमारे 2.55 सेकंदांचा हा ट्रेलर व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला लावू शकतो. चित्रपटात (Movie) आयुष्मान खुरानाला ऑर्थो डॉक्टर व्हायचे होते, पण तो स्त्रीरोगतज्ञ बनतो... पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने अनेक लोक त्याच्याकडून उपचार करण्यास नकार देतात.

Doctor G Trailer
Bollywood News| मलायका अरोराच्या शोमध्ये अरबाज खानसोबत येणार अर्जुन कपूर?

एक पुरूष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे त्याला आपल्या व्यवसायात किती संघर्ष करावा लागतो हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अनेक लोक त्याची पुन्हा पुन्हा खिल्ली उडवताना दिसतात. त्याचबरोबर रकुल प्रीत सिंह देखील या चित्रपटात लेडी डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील आयुष्मानचे डायलॉग्सही जबरदस्त आहेत, जे ऐकून तुम्ही स्वतःला हसू आवरत नाही.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग यांच्यातील अप्रतिम रोमँटिक केमिस्ट्री देखील दिसून येते. विनीत जैनच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' हा चित्रपट पुढच्या महिन्यात 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com