बाहुबलीचा बर्थडे,प्रभासचं प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट

साउथचा सुपरहिट हीरो प्रभासचा 42 वा वाढदिवस.
बाहुबलीचा बर्थडे,प्रभासचं प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट
Prabhas special gift for the Fans Dainik Gomantak

बाहुबली (Baahubali) म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा आज 42 वा वाढदिवस. प्रभासचा (Prabhas) जन्म 1979 रोजी चेन्नई येथे झाला. प्रभासने त्याच्या अभिनय क्षेत्रात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवूया त्याच्यासंबंधित काही खास गोष्टी.

प्रभासने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2002 साली 'ईश्वर' या तेलगू चित्रपटून केली होती. नंतर त्याने योगी, वर्षम, रेबेल, बाहुबली: द बिगनिंग आणि बाहुबली द कन्क्लुजनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रभासचे वैशिष्ट्य म्हणजे तो एकावेळी एकच चित्रपट करतो.

* बाहुबली चित्रपट

बाहुबली चित्रपट पूर्ण व्हायला 5 वर्षे लागली. या काळात त्याने कोणताही चित्रपटाचे काम घेतले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांना प्रभासचे चित्रपटात वजन वाढले पाहिजे असे वाटत होते . पण तो लठ्ठ दिसत नव्हता. एक अहवालानुसार, त्याला बाहुबलीसाठी 25 कोटी रुपये मिळाले. साऊथमधील चाहते प्रभासला 'डार्लिंग' म्हणतात, कारण त्याचा 2010 रोजी रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट 'डार्लिंग' आला होता. 2012 मध्ये त्याने 'रेबेल' चित्रपटात काम केल्याने तो रेबेल स्टार म्हणून ओळखला जावू लागला.

Prabhas special gift for the Fans
आर्यन खान-अनन्या पांडे यांच्या चॅट मध्ये काय सापडले?

*अॅक्शन जॅक्सन पहिला हिंदी चित्रपट

बाहुबलीपूर्वी प्रभास अजय देवगणच्या 'अॅक्शन जॅक्सन'या चित्रपटामध्ये दिसला होता. या चिटपटामध्ये त्याने छोटासा कॅमिओ डान्स केला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील होती. तेव्हा प्रभासच चेहरा हिंदी चित्रपटामध्ये नवीन होता.

प्रभासने काल त्यांच्या 'राधे श्याम' या चित्रपटचा नवा लुक सोशल मिडियावर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. तर या चित्रपटाचा टीझर सुद्धा रिलीज झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com